आदर्की :
आदर्की खुर्द ता. फलटण येथे अंगणात खेळत असताना कु.नित्या ( वय 2 वर्ष) हिला सापाने दंश केल्याने मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी, अनिता करण खोमणे ( मूळ गाव कोपर्डे ता. खंडाळा) या आदर्की खुर्द ता. फलटण येथे माहेरी आल्या होत्या. त्यांची मुलगी कु. नित्या ही नेहमी प्रमाणे सकाळी अंगणात खेळत असताना सापाने तिच्या हाताच्या बोटाला दंश केला. तिला शासकीय रुग्णालय पिंपोडे बु. या ठिकाणी नेहत असताना रस्त्यातच गाडीमध्ये तिचा मृत्यू झाला. त्याचे आई-वडील यांना अश्रू अनावर झाले त्यांनी हंबरडा फोडला. ही बातमी कळताच दोन्ही कुटुंबावरती शोककळा पसरली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत व्यक्त होत आहे.











