Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

संत नामदेव महाराज पालखी सोहळा व सायकल यात्रेचे फलटण तालुक्यात शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी प्रवेश

टीम : धैर्य टाईम्स

 संत नामदेव महाराज पालखी सोहोळा व सायकल यात्रा शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता फलटण तालुक्यात प्रवेश करणार असून तालुक्याच्यावतीने साधू बुवा महाराज मंदिर, राजुरी येथे आणि त्यानंतर फलटण शहरात क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे सोहोऴयाचे यथोचित स्वागत करण्यात येणार आहे.

       नामदेव समाजोन्नती परिषद, पालखी सोहळा पत्रकार संघ आणि भागवत धर्म प्रसारक समिती यांच्या संयुक्त सहभागाने शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर ते शनिवार दि. ४ डिसेंबर या कालावधीत श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या ३० दिवसांच्या संत. नामदेव महाराज पालखी सोहळा व भव्य सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 

    तालुक्याच्या सीमेवर साधू बुवा महाराज मंदिर येथे आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, राजुरीचे सरपंच सचिन पवार यांच्यासह राजुरी, कुरवली, मुंजवडी पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, विविध भजनी मंडळे, किर्तनकार, प्रवचनकार आणि भक्त मंडळी या सोहळ्याचे यथोचित स्वागत करणार आहेत.

    फलटण शहरात क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, महाराष्ट्र सहकार परिषद माजी अध्यक्ष व दि यशवंत को - ऑप. बँकेचे चेअरमन शेखर चरेगावकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, विविध संस्थांचे पदाधिकारी, तालुक्यातील किर्तनकार, प्रवचनकार, विविध भजनी मंडळे, ह.भ.प. गणपतराव तथा बबनराव बाबुराव निकम, ह.भ.प. केशव महाराज जाधव व त्यांचे सहकारी आणि शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी,शिंपी समाज महिला मंडळ अध्यक्ष व सहकारी, फलटण शहर व परिसरातील भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत.

        त्याच बरोबर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजीराव बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार, अ. भा. मराठी पत्रकार परिषद सातारा जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे व त्यांचे सहकारी सर्व पत्रकार, पालखी सोहोळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे व त्यांचे सहकारी पत्रकार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

       संत नामदेव महाराज पालखी सोहोळा व सायकल यात्रेचा शुक्रवार दि. ४ रोजी येथील शिंपी समाज विठ्ठल मंदिरात मुक्काम असून तेथून सकाळी ६ वाजता सोहोळा तरडगाव कडे मार्गस्थ होईल. 

    संत नामदेव महाराज यांचा जन्म दि. २६ ऑक्टोंबर १२७० मध्ये पंढरपूर येथे झाला आणि दि. ३ जुलै १३५० रोजी त्यांनी संजीवन समाधी घेतली. ८० वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबातले चरित्रकार, आत्म चरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. 

       अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भागवत धर्माचा प्रचार व प्रसार त्यांनी महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातही पायी प्रवास करुन केला, पंजाब मध्ये तर त्यांचे काही अभंग पंजाबी धर्म ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER