फलटण प्रतिनीधी :- शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असणारा धुळदेव येथील गट नंबर ४५ मधील आर.एम.सी प्लांट मधील मुद्देमाल पालखी महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनी यांनी हलवून इतरत्र सुरू केल्याने नक्की कोण कोण अधिकारी व कर्मचारी ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनीस मेहरबानी दाखवत आहे हे येणाऱ्या काळात न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याने न्यायालयात अनेक अधिकारी व कर्मचारी यांची छुपे चेहरे समोर येणार आहेत.
-"तेरी भी चूप मेरी भी चूप"-
फलटण महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नसताना धुळदेव येथील गट नंबर ४५ मधील देवस्थान इनाम वर्ग जमिनीमध्ये चार वर्षापूर्वी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या मूकसंमतीने पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनी यांनी आर.एम.सी प्लांट उभा केला. या आर.एम.सी प्लांट कोणत्याही प्रकारची बिनशेती परवानीशिवाय चार वर्षापासून बेधडपणे बेकायदेशीर बिनशेती वापर सुरू होता. तलाठी कार्यालय धुळदेव यांच्या पासून हाकेच्या अंतरावर हा प्लांट सुरू होता शासनाच्या कामात शासनाची परवानगी न घेता महसूल बुडवून शासनाकडुन अधिकचे पैसे कमविण्याचा पालखी महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनी यांचा सपाटा सुरू होता. "तेरी भी चूप मेरी भी चूप" हे धोरण अवलंबित महसूल विभाग व पालखी महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनी यांनी मागील चार वर्षात बराच गोलमाल केला असल्याचे बोलले जात असून येणाऱ्या काळात त्याची पोल खोल निश्चित होणार आहे. पालखी महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनीस मदत करणाऱ्या उपविभागीय अधिकारी व तहसिलदार, मंडळअधिकारी व तलाठी याच बरोबर अनेक जबाबदार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मागे चौकशीचा फार्स लागणार आहे.
धुळदेव येथील गट नंबर ४५ मधील आर.एम.सी प्लांट सुरू केला याबाबात अनेक लेखी तक्रार अर्ज उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना प्राप्त झाले असताना तसेच प्लांट सील केला होता तरीही दोनदा सील तोडून प्लांट सुरुच ठेवण्यात आला होता.पुन्हा याबाबत तक्रार दाखल होताच धुळदेव येथील गट नंबर ४५ मधील प्लांट आर.के.चव्हाण कंपनी विरोधात शहर पोलीस स्टेशन येथे महसूल विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सील तोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सर्व मुद्देमाल आर.एम.सी प्लांट इतरत्र हलवला जाणार आहे असे लेखी स्वरूपात दाखल करूनही उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव यांनी डोळेझाक करत हा प्लांट इतरत्र हलवण्यास मदत केल्याने शासनाचा लाखोंचा महसूल पाण्यात गेला आहे. गेल्या सात दिवसापासून उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव याबाबत कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करत नसल्याचे नक्की त्यांचे हात कशाने बांधले आहेत हे स्पष्ट झाले नसल्याने पालखी महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनी कायद्याचे लचके तोडत आहे.
ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनीस कायद्याचा धाक राहिला नाही-
फलटण तालुक्यात पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनी गेली चार वर्ष कोणालाही न जुमानता बेभानपणे बेकायदेशीर कामे करत असून धुळदेव येथील गट नंबर ४५ मधील आर.एम.सी प्लांट वर गुन्हा दाखल होऊनही तसेच तसेच सर्व मुद्देमाल आर.एम.सी प्लांट इतरत्र हलवला जाणार आहे असे लेखी स्वरूपात दाखल करूनही पोलीस निरीक्षक हेमंत शहा यांनी कोणत्याही प्रकारची दक्षता न घेतल्याने गुन्ह्यातील आर.एम.सी प्लांट पालखी महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनी ने हलवला
https://dhairyatimess.com/post/9869 आर. के चव्हाण कंपनीवर महसूल विभाग मेहेरबान
दाखल गुन्ह्यात पंचनामा, जाबजबाब झाला नसताना तसेच चार्टशिट दाखल करण्याकरता फोटो व व्हिडिओ आवश्यक असतात जबाबदार शहर पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दाखल घेतली नसल्याचे पालखी महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनी सर्व मुद्देमाल आर.एम.सी प्लांट इतरत्र हलवला याबाबत पोलिस निरीक्षक हेमंत शहा यांनी दाखल तक्रार अर्जावर अद्यापही कोणत्याही प्रकारची दक्षता न घेतल्याने न्यायालयात गुन्ह्यातील आर.एम.सी प्लांट पालखी महामार्ग ठेकेदार आर.के.चव्हाण कंपनी विरोधात कशी
चार्टशिट दाखल करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काळात न्यायालयात सर्व मुद्देमाल आर.एम.सी प्लांट इतरत्र हलवला जाणार आहे असे लेखी स्वरूपात दाखल केल्याचाही पत्राचा पुरावा न्यायालयात दाखल केला जाणार असल्याने शहर पोलिस प्रशासन न्यायालयात उघडे पडणार आहे.
-आर.एम.सी प्रकरण चांगलेच भोवणार-
एकंदरीतच उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव तसेच पोलीस निरीक्षक हेमंत शहा, मंडळअधिकारी धुळदेव व तलाठी धुळदेव यांना सदर प्रकरण चांगलेच भोवणार असून सदर प्रकरण न्यायालयीन व शासकीय स्तरावर पुराव्यासह दाखल होणार असल्याचे दिसून येत आहे. महसूल व पोलिस प्रशासन यांनी लवकरच हलवण्यात आलेला मुद्देमाल पुन्हा त्या ठिकाणी हजर करण्यास कमी पडल्यास पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचा ठपका सर्व जबाबदार महसूल व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर बसणार असल्याचे चित्र दिसत आहे. सद्यस्थितीत गप्प बसणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्यायालयात तोंड उघडावे लागणार हे निश्चित झाले आहे.
उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव तसेच पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अन्यथा सदर प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी याप्रकरणी कोणत्याही प्रकारचे कारवाईचे आदेश सबंधित विभागांना स्थानिक पातळीवर न दिल्याने ही साखळी नक्की कुठ पर्यंत पोहचली आहे याचा अंदाज येत नाही.



















