Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

म्हसवडच्या फार्मसी कॉलेजच्या सचिवाची मुजोरी

कॉलेजच्याच होस्टेलवर राहण्याची सक्ती, नाही राहिलेस बघून घेणेची भाषा, प्रकरण पोलिसांपर्यंत
टीम : धैर्य टाईम्स
Mujori, Secretary, College of Pharmacy, Mhaswad
म्हसवड येथे असलेल्या माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या फार्मसी कॉलेजमध्ये सचिवाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी वैतागले असून या छळप्रकरणी 14 विद्यार्थ्यांनी थेट म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

म्हसवड : येथे असलेल्या माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या फार्मसी कॉलेजमध्ये सचिवाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी वैतागले असून या छळप्रकरणी 14 विद्यार्थ्यांनी थेट म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, या कॉलेजमध्ये माण तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली शिक्षण घेत असून कॉलेजकडून विद्यार्थ्यांसाठी खासगी इमारतीत वसतिगृहाची सोय केली आहे. परंतु, तेथे पर्याप्त सुविधा नसल्याचा अनेक विद्यार्थिनींचा आरोप आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थिनींनी तेथे न रहाता दुसरीकडे खासगी वसतिगृहात राहणे पसंत केले. त्यामुळे हे कॉलेज चालविणार्‍या ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीचे सचिव दादासाहेब कोडलकर यांचे पित्त खवळले. त्यांनी या बाहेरच्या वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनींना दररोज दमदाटी करण्याचा प्रकार सुरु केला. ‘कॉलेजच्या आवारात का आलीस, तुझा या महाविद्यालयाशी संबंध नाही’, अशा शब्दात कोडलकर पाणउतारा करत होते. शिवाय नाहक कारणावरून विद्यार्थिनींची कोंडी करत होते.
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षण सुरु होते. त्या काळात त्रास देण्याच्या हेतूने विद्यार्थिंनींना कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधूनही रिमूव्ह करण्यात आले. तसेच यासंबंधी विचारणा करण्यासाठी गेल्यावर संबंधित विद्याथीर्र्नीला दमदाटी करून अरेरावीची भाषा वापरली तसेच शाळेच्या दाखल्यावरती लाल शेरा देऊन अ‍ॅडमिशन रद्द करण्याची धमकी दिली.
यासंबंधी विद्यार्थिनींनी चित्रीकरण तसेच अन्य सर्व पुरावे जोडून या छळाबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांनाही पाठवले आहे.
दरम्यान, पीडित विद्यार्थिंनीनी याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल केली आहे.
कॉलेजमध्ये उपयुक्त सामुग्री न देणे, व्हॉट्सअ‍ॅप गृपमधून रिमूव्ह करणे, परीक्षेस बसू न देणे, रात्री अपरात्री फोन करून दमदाटी करणे आदी तक्रारी या फिर्यादीत नमूद करण्यात आल्या असून पोलीस तक्रारी झाल्यानंतर विद्यार्थीनींना परीक्षेस बसू देण्यात आले.
भोंगळ कारभार
सध्या या संस्थेत मोठा भोंगळ कारभार सुरु असून सचिवाच्या हाती सर्व कारभार असल्याचे समजते. तसेच संस्थेविषयी काही बाबी न्यायप्रविष्ठ असल्याची चर्चा असून सचिव हाच मालक असल्याच्या तोर्‍यात वागत असल्याचा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय त्याच्या धाकामुळे शाळेतील शिक्षक वर्गही खासगीत याबाबत चर्चा करत आहे. एकंदरीतच या कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकमंत्री तसेच जिल्हाधिकार्‍यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे. येत्या काळात यात सुधारणा झाल्या नाहीत तर मोठे आंदोलन उभे राहण्याचीही शक्यता अनेकांनी  बोलून दाखवली. दरम्यान, यासंदर्भात दादासाहेब कोडलकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER