फलटण प्रतिनिधि -
ग्लोबल इकॉनॉमिक प्रोग्रेस अँड रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे देण्यात येणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम गोल्ड मेडल अवॉर्ड फलटण ( जि. सातारा ) येथील सुप्रसिद्ध अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना देण्यात आले. बेंगलोर (कर्नाटक) येथे एका शानदार समारंभात सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश पद्मनाभन आणि बंगलोर युनिव्हर्सिटीचे माजी व्हाईस कौन्सिलर डॉ. एच. शिवन्ना यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. ग्रामीण भारतातील सर्वोत्कृष्ट ऑर्थोपेडिक सेवेसाठी हा मनाचा पुरस्कार डॉ. जोशी यांना देण्यात आला आहे. गेल्या ७ वर्षातील डॉ. प्रसाद जोशी यांना मिळालेला हा ५ वा राष्ट्रीय पुरस्कार आहे.
वैद्यकीय प्रवासात मातोश्री, पत्नी डॉ. प्राची जोशी, जुळाभाऊ प्रसन्ना जोशी यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच हा पुरस्कार मिळाला असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी नम्रपणे नमूद करताना यांसर्वांचे विशेष आभार मानले आहेत. तर हे यश मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व कर्मचारी यांचेही याप्रसंगी डॉ. जोशी यांनी आभार व्यक्त केले आहेत. रूग्णांच्या आणि सर्व जन - समुदायाच्या निरोगी भविष्यासाठी तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि दयाळू काळजीचा प्रवास असाच अखंड सुरू राहील असे शेवटी डॉ. प्रसाद जोशी यांनी म्हटले आहे. डॉ. जोशी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.











