Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

पारदर्शी व भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा -प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

कमी मतदानाच्या ठिकाणची कारणे शोधून मतदानाचा टक्का वाढवावा
टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि.5:   भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा ततोतंत वापर करुन लोकांचा लोकशाही मुल्यांवरील, निवडणूक प्रक्रीयेवरील विश्वास वृध्दींगत करावा, पारदर्शी व भयमुक्त वातावरणात आगामी विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे. ज्या मतदार संघामध्ये मतदानाचा टक्का राज्याच्या सरासरी मतदानाच्या टक्क्यांपेक्षा कमी आहे,त्याठिकाणची कारणे शोधून त्यावर मार्ग काढावा व मतदानाचा टक्का वाढवावा. मतदार यादीतून नावांची वगळणी करत असताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

विधानसभा निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदीती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह सर्व प्रांतअधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

निवडणूक विषयक तयारीचा विधानसभानिहाय आढावा घेवून प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणाले,  सातारा जिल्ह्यात काही विधानसभा मतदार संघांमध्ये गत निवडणूकीतील मतदानाचा टक्का हा राज्याच्या निवडणूक मतदानाच्या टक्क्यापेक्षा कमी आहे.याची कारणे शोधून त्याठिकाणी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी,यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे यांची मदत घेण्यात यावी.मतदान केंद्रांवर सर्व पायाभूत सुविधा सूव्यवस्थित राहतील याची खात्री करावी.प्रत्येक पात्र मतदाराला त्याचे मतदान ओळखपत्र मिळेल याबाबत दक्षता घ्यावी.  मतदार यादीतून नावांची वगळणी होत असताना भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.  जास्त गर्दी होणा-या मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी बैठक व्यवस्था करावी, यासाठी टोकन पध्दती अंमलात आणावी.  मतदान कक्षामध्ये एकावेळी चार व्यक्तींना प्रवेश द्यावा, व्हीव्हीपॅट व पॉवर पॅक पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील हे कटाक्षाने पहावे. 

महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून निवडणूकीमध्ये तपासणी पथकांकडून जप्त करण्यात येणाऱ्या मुद्देमालांची संख्या अत्यंत कमी असते असे सांगून एस चोक्कलिंगम म्हणाले, या निवडणूकीमध्ये एफएसटी, एसएसटी पथकांनी अत्यंत दक्ष राहून कारवाई करावी.  कोणत्याही पध्दतीने पैश्याचे अथवा अन्य बाबींचे प्रलोभन देवून मतदान प्रक्रीयेवर प्रभाव टाकला जाणार नाही याबाबत सर्वोतपरी काळजी घ्यावी, लोकांना पारदर्शी व भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.  

प्रिसायडींग अधिकाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था अत्यंत उत्तम करण्यात यावी, कोणत्याही स्थितीत निवडणूक यंत्रसामुग्रीसाठी ताटकळत उभे रहावे लागू नये यासाठी सेक्टर अधिकारी नियुक्त करुन त्यांच्यामार्फत पोलिंग पार्टीजना यंत्रसामुग्री देण्यात यावी व त्याच पध्दतीने जमाही करुन घेण्यात यावी.  निवडणूकीसाठी नियुक्त मनुष्यबळांना आवश्यक प्रकारचे प्रशिक्षण देण्यात यावे.  निवडणूक आयोगाला कळविण्यात येणारी विविध प्रकारची माहिती अत्यंत बिनचूक असावी,  तपासणी नाके कार्यरत करावेत.लक्झरी बसेस, खाजगी वाहने यांच्याबरोबरच हेलिकॉप्टर यांचीही काटेकोरपणे तपासणी व्हावी.  प्रचार कालावधीमध्ये सामाजिक सौदार्ह बिघडवणारी वक्तव्ये झाल्यास त्वरीत कारवाई करण्यात यावी. 

या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, बोगस मतदार नोंदणीसंदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपांचे विहीत मुदतीत निराकरण करण्यात येईल असे सांगून जिल्ह्यात करण्यात आलेल्या निवडणूक विषयक तयारीचा आढावा सादर केला.  पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनूषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.   

या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभाग, आचारसंहिता, मनुष्यबळ, बॅलेटपेपर, दळणवळण, इव्हीएम, सामग्री, माध्यमप्रमाणीकरण व संनियंत्रण आदी सर्व विषयांच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER