फलटण प्रतिनिधी:- साखरवाडी येथे एका तरुणाने बजाज फायनान्सच्या कर्जापायी व दारूच्या नशेत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १९ रोजी रात्री १०:३० ते दिनांक २० सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान साखरवाडी जिल्हा परिषद शाळा (जुनी) तालुका फलटण जिल्हा सातारा येथे विशाल हनुमंत फडतरे (वय 35 वर्ष राहणार साखरवाडी जिल्हा परिषद शाळा (जुनी) तालुका फलटण जिल्हा सातारा) याने बजाज फायनान्सच्या कर्जापाई व दारूच्या नशेत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली याप्रकरणी किशोर जयवंत फडतरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास एएसआय हजारे करत आहेत.



















