Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

युवकांनो आताच सावध व्हा... वेळ पुन्हा येणार नाही

टीम : धैर्य टाईम्स

आमचं काळीज, भावी नगरसेवक, युवकांचे आशास्थान,युवा नेते, भैया, दादा, असे म्हणणारे व म्हणून घेणाऱ्या युवकांनो सावधान. आपण एखाद्या स्वार्थी राजकीय नेत्याच्या चक्रव्हूवात अडकत तर नाही ना हे जाणून घ्या. यासाठीच हा लेख प्रपंच..

राजकारण करायचे असल्यास युवा नेते बनण्यापूर्वी निदान स्वतःच्या दोन वेळच्या भाकरीची तजवीज करून ठेवा मगच सक्रिय राजकारण आपला वेळ द्या.

व्याजाने पैसे आणून कितीही मोठ मोठाले होर्डिंग्ज लावले तरी घरी कुणीही धान्य आणून देत नाही आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यालाच पार पाडावी लागणार आहे हे लक्षात ठेवा. तुमची उपयुक्तता संपली की तुम्हाला तुमचे आदर्श नेते खरूज लागलेल्या कुत्र्याप्रमाणे फाटकाबाहेर उभे करतील असे अनुभव अनेकांनी घेतले आहेत याची माहिती घ्या.

तुम्ही हातात मोठ्या अभिमानाने मिरविलेले पिवळे, भगवे, निळे, लाल, आणि हिरवे झेंडे तुमच्या अवस्थेवर खो खो हसतील आणि आयुष्यातील तरुणपणाची वेळ निघून गेल्यावर निराशाजनक आयुष्याशिवाय हाती काहीच लागणार नाही. नोकरी किंवा व्यवसाय नसलेल्या तरुणांचा भविष्यकाळ अत्यंत बिकट असणार आहे.

कुणी आपला स्वाभिमान विकलेला आहे, कुणी कळलाव्या नारदाची भूमिका बजावत आहे हे ध्यानात घ्या. आपण ज्या नेत्यांना आदर्श मानतो त्यांची संपत्ती किती आहे, त्याने हे धन कुठे कष्ट करून कमवले आहे याचा अभ्यास करा. अनेक वाममार्गानेच तुमचे आवडते नेते पैशांनी गब्बर झालेले आहेत व येथून पुढे राजकारण हे त्यांच्याच अवती भवतीच फिरत राहील याची ते सोयीस्करपणे मांडणी करतात यावर विचार करा.

पक्ष, पक्ष- संस्कार, पक्षाची विचारधारा या निव्वळ पोकळ गप्पा असून या भाकडकथा तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना फुकटात राबवून घेण्यासाठीच रचलेल्या असतात. जेवढा वेळ आपण नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवितो, तेवढ्या वेळात एखादे छोटे मोठे काम वा व्यवसाय करून आपण कुटुंबासाठी कमवून आपण आपल्या आई वडिलांचे स्वप्नं पूर्ण करू शकतो. या जगात आपल्या स्वतः पेक्षा मोठा विकासपुरुष अन्य कुणीही असू शकत नाही हे ध्यानात घ्या. 

आपल्या एकामुळे जगाचे काहीही बरे-वाईट होत नाही. आपण स्वतःचा विकास केल्यास राष्ट्राचा विकास आपोआप होतो. लाखांच्या गाडीत हिंडणाऱ्या व्यक्तीस गरीबाशी, बेरोजगाराशी काहीही देण घेण नसतं, तो फक्त आपला स्वार्थ जपत असतो. त्यामुळे आपली घरची परिस्थिती बेताची असल्यास नेत्यांच्या अजिबात मागे लागू नका.

आपल्याला पुढे आर्थिक चणचण, शुगर, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, राजकारणाच्या नादी लागून फुकटचे विकत घेतलेले शत्रुत्व व बेरोजगारी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले तर जेव्हा तुमचे आवडते नेते तुम्हाला कसलीही आर्थिक मदत करणार नाहीत हे लक्षात घ्या किंवा आपल्या नेत्याला याविषयी अजमावून घ्या म्हणजे आपले डोळे उघडतील. 

तुमचं तारुण्य निघून गेल्यावर कुणीही तुम्हाला दारू पाजणार नाही किंवा मटन खाऊ घालणार नाही, कारण तुमचा उपयोग संपल्यावर अन्य कुणी तरी दुसरा मूर्ख तरुण रिक्रुटमेंटसाठी कायम नेत्यांपुढे तयार असेल त्यावेळी आपले आयुष्य वाया गेले ही एकमेव भावना मनात आल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे स्वतःला सावरून आयुष्य संपन्न बनविण्याचे हेच वय असते हे ध्यानात घ्या व नेत्यांच्या मागे धावण्यात आयुष्य वाया घालवू नका.

सचिन मोरे, संपादक - धैर्य टाईम्स, फलटण 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER