Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान !

६ जानेवारी पत्रकार दिन पोंभुर्ले येथे शासकीय कार्यक्रम व्हावा यासाठी मी आग्रही : ना.रवींद्र चव्हाण

टीम : धैर्य टाईम्स

पोंभुर्ले, दि.६ : "पत्रकार दिनाचे कार्यक्रम राज्यात सर्वत्र होत असतात; पण बाळशास्त्रींच्या जन्मभूमीतील या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी शासकीय कार्यक्रम झालाच पाहिजे यासाठी मी आग्रही आहे", असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी च्या वतीने पोंभुर्ले येथील दर्पण सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पत्रकार दिन व दर्पण पुरस्कार वितरण समारंभात ना. चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ होते. व्यासपीठावर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ. प्रियांका धावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. चव्हाण पुढे म्हणाले, "पोंभुर्लेत शासकीय कार्यक्रम झाल्यास या कार्यक्रमाची उंची आणखी वाढेल. एकदा प्रशासन आले की, प्रशासनामुळे समृद्धी येते. यातून गावाचा विकास होईल. बाळशास्त्रींच्या नावे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांना फार मोठी प्रतिष्ठा आहे. समाजामधील अडचणींना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात. राज्यकर्त्यांनीही त्यांना मदत केली आहे. जांभेकरांसारख्या व्यक्ती आजही समाजमनावर राज्य करत असतात. त्यांचे मुंबईत स्मारक व्हावे या रवींद्र बेडकेहाळ यांच्या मागणीच्या अनुषंगाने आपण मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठकीचे निश्चितपणे आयोजन करू. तसेच इथून पुढे प्रत्येक पत्रकार दिनाला आपण पोंभुर्ले येथे उपस्थित राहू", असेही ना. चव्हाण यांनी सांगितले.

आयोध्या राम मंदिरावरून जन्मभूमीला किती महत्त्व असते हे सिद्ध झाले आहे. बाळशास्त्रींचे समग्र दर्शन व्हावे या उद्देशाने आम्ही त्यांच्या जन्मभूमीत या स्मारकाची उभारणी केली आहे. या महापुरुषाची महती लक्षात घेऊन पोंभुर्ले गावचा विकास व्हावा व कर्मभूमी मुंबईत त्यांचे स्मारक व्हावे", अशी अपेक्षा रवींद्र बेडकीहाळ यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केली. यावेळी डॉ जगदीश कदम, कैलास म्हापदी यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी बाळशास्त्रींच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ३१ व्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारांचे वितरण ना.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सम्पन्न झाले. यामध्ये राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार डॉ.सागर देशपांडे (पुणे), कैलास म्हापदी (ठाणे), श्रीकांत कात्रे (सातारा), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार - सौ.कृतिका पालव (मुंबई), साहित्यिक गौरव पुरस्कार - डॉ.भगवान अंजनीकर (नांदेड), विशेष ‘दर्पण’ पुरस्कार - शशिकांत सोनवलकर (दुधेबावी, ता.फलटण), विक्रम चोरमले (फलटण) यांचा समावेश होता.

मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, विश्वस्त सौ.अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, रोहित वाकडे, अरुण खरात यांनी केले. सूत्रसंचालन व आभार विश्वस्त अमर शेंडे यांनी मानले.

कार्यक्रमास जिल्हा महिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माजी आमदार अजित गोगटे, राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पोंभुर्ले गावचे उपसरपंच सादिक डोंगरकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER