फलटण प्रतिनिधी :
फलटण तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून ज्येष्ठ नेते विक्रम आप्पा भोसले यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या कन्या तथा पंचायत समिती सदस्या शिवांजली विक्रम भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व तीन पंचायत समिती सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रवेशामुळे फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे.
विशेषतः पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. या निवडीनंतर तालुक्यातील राजकारत मोठी घडामोड झाली आहे.










