Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

वेगवान निर्णयांमुळे जिल्ह्याचा विकास गतिमान विकासकामांसोबतच योजनांच्या अंबलवजावणीत जिल्हा अग्रेसर

टीम : धैर्य टाईम्स

शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे व पर्यायाने जिल्ह्याचा व राज्याचा विकास करणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. या धोरणाला अनुसरून सध्या राज्य शासनाचे काम सुरू आहे. सातारा जिल्ह्यातही विकास कामे सध्या वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताराचे सुपुत्र असल्यामुळे त्यांचे जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे. तसेच गतिमान शासनाचा प्रत्यय आणून देणारे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वेगवान कामकाजामुळे जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे.

शासनाच्या महत्वाकांक्षी आणि नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा व शासकीय सेवांचा फायदा देणारी शासन आपल्या दारी या योजनेची सुरूवातच आपल्या जिल्ह्यातून झाली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेमुळे नागरिकांना शासकीय सेवा घरापर्यंत पोहचवण्यात येत आहेत. त्यासाठी आज प्रशासन नागरिकांच्या घरापर्यंत पोहचल्याचे पहायला मिळत आहे. पूर्वी लोकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. पण, आज ही परिस्थीत पूर्णतः बदलली आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या या संकल्पनेला प्रशासनानेही तितकाच चांगला प्रतिसाद देत आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 2 लाख 74 हजार 348 लाभांचे वाटप करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असल्यामुळे निजीकच्या काळात यामध्ये नक्कीच लक्षणीय वाढ झालेली दिसणार आहे.

 कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस विभागाचे काम आहे. त्यासाठी पोलीस विभाग सुसज्ज असणेही तितकेच गरजेचे आहे. याचाच विचार करून पोलीस दलाच्या अधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 6 मिनीबस, 7 स्कॉर्पिओ व पेट्रोलिंगसाठी 15 मोटार सायकल खरेदीस मंजूरी देण्यात आली आहे. तसेच महाबळेश्वर, सातारा व कराड शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यात आले आहेत.

 विकासासाठी पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या सुविधांची उपलब्धताही तितकीच महित्वाची असते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धरणे आहेत. तसेच पुर्वेकडे दुष्काळी भाग ही आहे. या दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच जिहे-कठापूर योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या योजनेमुळे 18 हजीर 970 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याशिवाय या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे आणखी 8 हजार 530 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागात सिंचनाच्या शाश्वत सुविधा उभारण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. या कामांमुळे माण तालुक्यातील दुष्काळ कायमचा नाहीसा होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत, वन विभागामार्फत अमृत सरोवर योजनेंतर्गत वनतळे बांधणे व दुरुस्ती करणे इत्यादी 22 कामे घेण्यात आलेली आहेत. तसेच जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, सातारा यांचे मार्फत पाझर तलाव दुरुस्ती करण्याची 38 कामे हाती घेण्यात आली आहेत.

याशिवाय शाश्वत सिंचन व चांगल्या पिण्याच्या पाण्याची सुविधेसाठी जनजागृती होणेही तितकेच महत्वाचे आहे. हे ओळखूनच शासाने नदी संवाद यात्रा या अभियानाचे आयोजन केले. या माध्यमातून लोकांपर्यंत पाणी प्रदूषण व पाण्याचे महत्व, नदी स्वच्छतेचे महत्व व त्याची गरज याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यात कृष्णा, वेण्णा आणि माणगंगा या नद्यांची संवाद यात्रा संपन्न झाली. या उपक्रमामध्ये शासन, प्रशासन, स्वयंसेवक, जलतज्ज्ञ यासोबतच नदीकाठची गावेही उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसली.

नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी त्यांना चांगली घरे उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे. तसेच परिसरही स्वच्छ व सुंदर असणे गरजेचे आहे. यासाठीच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेसाठी 36 कोटी 37 लाख 27 हजार , अनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार योजना (ग्रामीण) साठी 18 कोटी 03 लाख 72 हजार, डोंगरी भागात साकव बांधकामासाठी 9 कोटी 73 लाख 89 हजार, विद्युत जोडणी व विद्युत विकासासाठी 8 कोटी 49 लाख 99 हजार, नाविण्यपूर्ण योजनेसाठी 2 कोटी 39 लाख 49 हजार निधी देण्यात आला आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रामाणावर घरकूल योजनाही राबवल्या जात आहेत. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना या योजनांची कामगिरी चांगली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य आवास योजना अंतर्गत सन 2022-23 मध्ये 4 हजार 343 घरकुले बांधण्यात आलेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल करिता जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेंतर्गत घरकुल योजनेसाठी पात्र पण भूमिहीन /बेघर अशा 44 लाभार्थ्याना प्रति लाभार्थी 500 चौरस फूट पर्यंत जागा खरेदीसाठी 22 लाख अनुदान उपलब्ध करुन दिले आहे.

 शिक्षण हा ही एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळेच शासन विविध महामंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिष्यवृत्ती देत आहे. इयत्ता 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकामधील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी 40 लाख, इयत्ता 5 वी, 8 वी मधील मागासवर्गीय विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देणे या योजनेसाठी 18 लाख यासह इतर विविध योजनेसाठी या विभागामार्फत निधी वितरीत करण्यात आलेला आहे. शिक्षण विभागाकडील शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठी 23 कोटी 53 लाख, महिला व बालकल्याण विभागासाठी 17 कोटी 56 लाख इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे.

कृषि हा विकासातील एक महत्वाचा घटक आहे. आपला देश कृषि प्रधान असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासावर विशेष लक्ष दिलेले दिसून येते. जिल्ह्यातही कृषिच्या विकासासाठी अनेक कामे होताना दिसत आहेत. त्यामध्ये कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यात 6 हजार 229 लाभार्थ्यांना 32 कोटी 63 लाख रुपयांच्या विविध शेती औजारांसाठी अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत जिल्ह्यात एकूण 294 वैयक्तिक प्रस्तावांना कर्ज मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री शास्वत सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिचंन संचासाठी 5 कोटी 83 लाख 47 हजार रुपयांचे पूरक अनुदान वितरण करण्यात आले आहे.  अटल भूजल योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन संचासाठी 42 लाख 8 हजार रुपये पुरक अनुदान वाटप करण्यात आले आहे.

 एकूणच सध्याच्या शासनाच्या ध्येयधोरणाखाली सातारा जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. आपले सरकार गतिमान, निर्णय वेगवान याचा प्रत्यय जिल्ह्यात येताना दिसत आहेत.

 

हेमंतकुमार चव्हाण,
माहिती अधिकारी, सातारा

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER