Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

माणच्या दुष्काळी भागात फुलतेय सफरचंदाची बाग विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून उभा केला नवीन आदर्श

टीम : धैर्य टाईम्स

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक स्थैर्य तर प्राप्त करू शकतोच, पण, त्याचबरोबर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. असेच एक चांगले उदाहरण उभे केले आहे माण तालुक्यातील टाकेवाडीचे प्रगतशील शेतकरी जालंदर जगन्नाथ दडस यांनी.

            सातारा जिल्ह्यातील माण हा दुष्काळी प्रदेश म्हणूनच ओळखला जातो. पाणी फौन्डेशनच्या माध्यमातून येथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे. तसेच सिंचनाच्या अनेक योजना राबवून या भागात आता पाणी आले आहे. तरीही नैसर्गिक पाऊस हा कमीच असल्याने पाण्याची उपलब्धताही मर्यादीतच आहे. या सर्वावर मात करत जालंदर दडस यांनी माण सारख्या दुष्काळी भागात बाग फुलवली आहे आणि तीही चक्क सफरचंदाची. ऐकूण आश्चर्य वाटले ना. पण, हे खरं आहे. सिमला, काश्मिर सारख्या थंड हवेतील पीक अशी ओळख असलेले सफरचंद आता माण तालुक्यातील डोंगर रांगावरही घेता येते हे श्री. दडस यांनी दाखवून दिले आहे.

            टाकेवाडीचे जालंदर जगन्नाथ दडस यांनी 10 वी नंतर सातारा येथून आयटीआय केले. त्यानंतर पुणे येथे एनसीपीसी केले. सुरुवातीला बजाज ॲटो पुणे येथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम केले. पण, तिथे त्यांचे मन फारसे रमले नाही. म्हणून ते आपल्या गावी परत आले आणि शेतीकडे त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांच्या या ध्येयाला जिल्हा परिषद व कृषि विभाग यांचीही चांगली साथ मिळाली.

            शेतीत प्रयोग करायचे तर अनेक सुविधा उभे करणे ही गरज असते. या सुविधा उभारण्यासाठी त्यांनी शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्यांना ठिबक सिंचनासाठी 1 लाख रुपयांचे अनुदान मिळाले. त्यासोबतच विहीरीसाठी दीड लाख, 10 गुंठ्यात उभारण्यात आलेल्या शेडनेट साठी दीड लाख, पॅकिंगहाऊससाठी दीड लाख तर गांडूळ खत प्रकल्पासाठी 20 हजार आणि नॅरेफसाठी 20 हजार रुपये असे अनुदान त्यांना मिळाले. या शासनाच्या विविध योजना एकत्रित करून त्यांनी शेतीमध्ये फळबाग लागवड केली.

            सुरुवातीस डाळिंब, सिताफळ यांची बाग केली. त्याचबरोबर भाजीपालाही घेत असत. सांगली येथील वन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी त्यांच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आले असता त्यांनी या भागामध्ये सफरचंदाची शेती होऊ शकते असे सांगितले. त्यांच्या या सूचनेनुसार श्री. दडस यांनी धोका पत्करण्याचे ठरवले. धोका अशासाठी की एक तर सफरचंद हे थंड हवेतील फळ, त्यात माण तालुक्यातील हवा ही उष्ण आणि कोरडी. त्यामुळे हा एक प्रकारचा धोका पत्करणेच होते. पण, त्यांनी मनावर घेतले आणि सुरुवातील 8 गुंठे क्षेत्रावर त्यांनी सफरचंदाची सिडलिंग राफ्टिंगद्वारे लागवड केली.

            तिसऱ्या वर्षी सफरचंदाचे उत्पादन निघाले. 8 गुंठ्यामध्ये त्यांना 400 ते 500 किलो फळ मिळाले. सरासरी 130 रुपये किलो दराने त्याची विक्री करण्यात आली. त्यातून त्यांना सुमारे साडे पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळाले. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी 30 गुंठ्यात सफरचंदाची बाग तयार केली. त्यामध्ये अण्णा, हरमन, डोरस्ट गोल्डन या जातीच्या सफरचंदाची लागवड केली. त्यामध्ये 13 गुंठ्यांमध्ये एम-9. एम-7, एम – 111 या जातींची हॉलंड आणि इटलीमधून मागवलेली रोपे लावली आहेत. तसेच 5 ते 6 गुंठ्यात त्यांनी नर्सरीही सुरु केली आहे.

            मे ते जून मध्ये फळ काढणीसाठी येतात. यंदाच्या वर्षी या बागेतील सर्वच्या सर्व 800 झाडांना फळधारणा होणार असल्याचे श्री. दडस यांनी सांगितले. तिसऱ्या वर्षी एका झाडाला 15 किलो फळ येते. तर चौथ्या व पाचव्या वर्षापासून किमान 40 ते 50 किलो फळ एका झाडापासून मिळते असेही श्री. दडस यांनी सांगितले. तसेच जमीन गाळाची व निचऱ्याची असावी लागते. त्यामुळे फळ धारणा चांगली होते. सध्या त्यांच्या शेतामध्ये सिंगल लिडर पद्धतीने वाढलेली झाडे आहेत. त्यामुळे  उत्पादन चांगले मिळतेच शिवाय झाडाचे आयुष्यही वाढत असल्याचे ते म्हणाले. पुढील वर्षाच्या हंगामामध्ये किमान 35 ते 36 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            या शिवाय शेतामध्ये डांळिंबाची दीड एकरात 850, सिताफळाची दीड एकरात 700 झाडांबरोबरच आंबा, नारळ, अंजिर, जांभूळ, रामफळ अशी फळझाडे लावली आहेत.  संपूर्ण शेती ही सेंद्रीय पद्धतीने करत असल्याचेही श्री. दडस यांनी सांगितले.

            या संपूर्ण प्रकल्पामध्ये शासकीय योजनांची व शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाची सर्वात मोठी मदत झाल्याचे श्री. दडस आवर्जून सांगतात. ज्या ज्या वेळी अडचण आली त्या त्या वेळी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य मार्गदर्शन केल्याचे सांगून शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळाल्यामुळे शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना  त्यांनी व्यक्त केली.

            विशेष म्हणजे श्री. दडस यांना जिल्हा परिषदेचा सेंद्रीय शेतीसाठीचा डॉ.जे.के.बसू सेंद्रिय व अधुनिक शेती पुरस्कार 2022-23 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. माण सारख्या दुष्काळी भागात विविध शासकीय योनजा राबवून शेतीमध्ये चांगले प्रयोग करून जालंदर दडस यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हा मंत्र दिला असल्याचे दिसून येते.         

हेमंतकुमार चव्हाण

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER