फलटण प्रतिनिधी - प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनास पाठिंबा व अन्य मागण्या संदर्भात फलटण येथील तहसील आवाराच्या बाहेर प्रहार संघटनेचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावेळी संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची ऍलर्जी प्रहार संघटनेला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे प्रहार संघटनेच्या आंदोलकांना बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी आंदोलनास पाठिंबा देऊ नये असे आवाहन कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सनी घनशाम काकडे यांनी केले आहे.
सनी काकडे यांनी पुढे असे म्ह्टले आहे की, डॉ. आंबेडकरांनी संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लढण्याचा अधिकार दिला त्या डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेचे प्रहार संघटनेला ऍलर्जी असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे बौद्ध समाज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या संघटना यांनी प्रहार संघटनेच्या सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देऊ नये.