सातारा, दि. 21, (जि.मा.का.) – सोबतच्या फोटोतील अथर्व हिरेश पाटील, वय 13 वर्ष 11 महिने या बालकाच्या सांगण्यानुसार वडिलांचा मृत्यू झाला आहे. बाल आईसोबत मुंबईला गेला असता चर्चगेटवर आई बालकाला सोडून गेली आहे. सदर बालक चर्चगेटवर विनापालक आढळून आला असल्याने त्यास बाल कल्याण समिती, मुंबई सुबुर्बन यांनी काळजी व संरक्षणासाठी मानखुर्द येथील संस्थेत दाखल केले. बालकाने सांगितल्याप्रमाणे नंतर त्यास जिल्हा परिविक्षा अनुसंरक्षण संघटना, पुणे येथे काळजी व संरक्षणासाठी दाखल केले. त्यानंतर बालकाच्या म्हणण्यानुसार तो सातारा येथील असल्याने त्यास बाल कल्याण समिती, सातारा येथे बदली केली. बाल कल्याण समिती सातारा यांनी सदर बालकास जिल्हा परिविक्षा अनुसंरक्षण निरिक्षणगृह/ बालगृह सातारा येथे दाखल केले आहे.
बालक सोमनाथ संस्थेत दाखल झाल्यापासून आजपर्यंत त्यास आई किंवा कोणीही नातेवाईक भेटायला आले नाहीत किंवा कोणीही फोन केला नाही.
बालक अथर्वच्या पालक, नातेवाईक यांना आवाहन करण्यात येते की, निवेदन प्रसिद्ध झाल्यापासून तीस (30) दिवसांच्या आत जिल्हा परिविक्षा अनुसंरक्षण संघटना, सातारा निरीक्षणगृह/बालगृह सातारा, दूरध्वनी क्र. 8793835345 या क्रमांकावर किंवा बाल कल्याण समिती, सातारा, दूरध्वनी क्रमांक -9423193277 किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षास सातारा दूरध्वनी क्रमांक – 9921380135 किंवा सातारा शहर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा.
दिलेल्या कालावधीमध्ये संपर्क न केल्यास बालकाचे सर्वोत्तम हित लक्षात घेता या बालकाचे पुनर्वसन केल्यावर कोणाचाही दावा राहणार नाही याची दखल घ्यावी, असे डी.वाय. ढेपे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.

















