Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

शासन आपल्या दारी अंतर्गत 27 हजार पात्र लाभार्थींना लाभ

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 16 : दौलतनगर ता.पाटण जि.सातारा  येथे  शासन आपल्या दारी -२०२३ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी सुमारे 19 हजार लाभार्थ्यांना 13 मे रोजी किंवा त्यापूर्वी लाभ देण्यात आला. उर्वरित सुमारे 8 हजार पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घरी किंवा गावात स्थानिक कर्मचाऱ्यांमार्फत पुढील 8 दिवसात लाभ पोहोचविण्यात येणार आहे.

या अभियानासाठी विविध विभागांकडून सुमारे 27 हजार लाभार्थी निश्चित करण्यात आले होते. या लाभार्थ्यांचा विभागनिहाय  निश्चित केलेली लाभार्थी संख्या, वाटप /लाभार्थी संख्या व घरोघरी जाऊन लाभ देणे शिल्लक संख्यांचा तपशिल अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे.

महसूल विभाग पाटण  - 10622 – 5513 - 5109, महसूलविभागकराड(सुपने मंडळ)- 1393 – 1294 – 99, पंचायतसमिती पाटण–9371 – 8042 – 1329, पंचायतसमिती कराड(सुपने मंडळ)–86 – 58 - 28, तालुकाकृषि अधिकारी कराड(सुपने) –257 – 166 – 91, तालुकाकृषि अधिकारी पाटण–1295- 882 – 413, नगरपंचायतपाटण–400 – 150 – 250, महावितरणतारळे/पाटण/मल्हारपेठ–657 – 350 – 307, वनविभागपाटण–60 – 26 – 34, ग्रामीणरुग्णालय ढेबेवाडी/ पाटण-चष्मा वाटप–99 – 43 – 46, दुय्यमनिबंधक कार्यालय पाटण117 – 90 – 27, वेलफेअर बोर्डसातारा836 – 716 – 120, जिल्हामहिला व बालविकास कार्यालय सातारा जिल्हा–19 – 0 – 0, जिल्हा रुग्णालयकराड/PHC सुपने10 – 10 – 0, अण्णासाहेबआर्थीकविकास महामंडळ38-  36 – 2, पंडित दिन दयाळउपाध्याय महा रोजगार मेळावा700 – 498 – 0, आरोग्यशिबीर1200 – 1133 – 0, बँक ऑफमहाराष्ट्र2 – 2- 0 असे एकूण एकंदर 27162 – 19009 – 7855.

 या अभियानाच्या निमित्ताने  पाटण तालुक्यातील खेडोपाडी व दुर्गम भागात प्रशासन पोहचले. शैक्षणिक कारणासाठी नेहमी लागणारा  जातीचा दाखला ,उत्पन्नाचा दाखला ,डोगरी व दुर्गम भागातील दाखला ,रहिवास दाखला , नोकरीसाठी महत्वाचा मानला जाणारा भूकंपग्रस्त दाखला इत्यादी विविध सुमारे १०००० पेक्षा अधिक दाखल्याचे महसूल विभागामार्फत वितरण करण्यात येत आहे.  नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होताना विद्यार्थ्यांची  दाखला मिळविण्याची धावपळ या निमित्ताने निश्चितपणे कमी होणार आहे. जे विद्यार्थी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या दिवशी  हजर राहू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांचे दाखले संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांचे मार्फत घरपोहोच करण्यात येत आहे.

या अभियानाच्या शुभारंभाच्या दिवशी दौलतनगर ता.पाटण येथे  अद्यावत आरोग्य सुविधेसह आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील सुमारे १००० पेक्षा अधिक व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला.

याच अभियानाचा एक  भाग म्हणून व  पाटण तालुक्यातील सुशिक्षित  युवकांना रोजगाराची संधी उपलब्द्ध व्हावी म्हणून दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेत बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक सभागृह येथ  पंडीत दिनदयाळ उपाध्याय महा रोजगार  मेळाव्याचे आयोजन केले  होते . या प्रसंगी विविध कंपन्याचे सुमारे २६ प्रतिनिधी तसेच महामंडळ व व्यवसाय योजनेचे ९ प्रतिनिधी  उपस्थित होते. यावेळी  परिसरातील  सुमारे ५०० उमेदवारांनी या ठिकाणी भेट दिली. त्यापैकी १५ उमेदवारांना जागेवरच रोजगार प्राप्त झाला असून सुमारे २५१ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे .

कामगार कल्याण विभागाकडून या निमित्ताने पाटण मधील  सुमारे ७२० अकुशल कामगारांना अत्यावशक व सुरक्षा संच (हेल्मेट ,बूट ,बॅटरी इत्यादी ) पुरविण्यात आले आहे .त्यामुळे त्यांच्या कामाची गुणवत्ता तर वाढणार आहेच शिवाय त्यांना सुरक्षितरित्या काम करण्यास मदत होणार आहे.

याशिवाय कृषी विभागा मार्फत,ट्रॅक्टर, पावर टिलर,  इत्यादी विविध औजाराचे  वितरण केल्याने शेतकऱ्यांना  शेतीकामात निश्चित पणे  मदत होणार आहे. समाजकल्याण विभागामार्फत सुमारे ३५ दिव्यांग  व्यक्तींना  व्हील चेअरचे वाटप करून  दिव्यांगांप्रती महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे .याशिवाय सुमारे १०० अंध व्यक्तीना आरोग्य विभागामार्फत चष्म्याचे वाटप करून त्यांना नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न शासनाने या अभियानाच्या माध्यमातून केला आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी रमाई  आवास योजना शासनाची महत्वाकांशी योजना आहे. पाटण तालुक्यात होणारी अतिवृष्टी व दुर्गमता लक्षात घेता स्वत:च्या हक्काचे पक्के  घर असणे खूप महत्वाचे आहे.  त्या दृष्टीने तालुक्याकरिता मुख्यमंत्री यांनी विशेष बाब म्हणून या योजनेअंतर्गत सुमारे १५० घरकुलांना (१.८० कोटी रु ची)  मान्यता  दिली .त्यामुळे पाटण तालुक्यातील १५० कुटुंबाना स्वत:च्या हक्काचे घर लवकरच उपलब्द्ध होणार आहे.

पाटण तालुक्यातील अनेक युवक मोठ्या प्रमाणात  पोलीस भरती साठी प्रयत्न करत आहे.  शासनाने नोव्हेंबर २०२२ मध्ये सुधारित शासन निर्णय निर्गमित करून भूकंपग्रस्तांच्या  पणतू ,खापर पणतू यांना देखील लाभ अनुज्ञेय केला आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्ताच्या चौथ्या पिढीला  पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्या मुळे  सुमारे १५ वर्षानंतर न्याय मिळाला असून  त्यांना ह्या दाखल्याच्या आधारे  शासकीय नोकरीत प्रवेश मिळण्याचा मार्ग  सुकर झाला आहे .   या शासन निर्णयानुसार आत्तापर्यंत २०० पेक्षा अधिक  पणतूना दाखले दिले आहेत. त्यामुळे शासकीय नेाकरी मिळविण्याच्या  भूकंपग्रस्तांच्या  चौथ्या पिढीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नितीन जगन्नाथ भिसे रा मल्हारपेठ यांचे  अनेक वेळा प्रयत्न करून हि निवड होत नव्हती. नितीन भिसे ह्याची  तर आठ वेळा प्रयत्न करूनही  निवड होत नव्हती. भूकंप ग्रस्त दाखल्यामुळे त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे . त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धन्यवाद दिले आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER