Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

प्रशासनाने 2013 च्या ऊस आंदोलनाची पुनरावृत्ती टाळावी

पंजाबराव पाटील : बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा
टीम : धैर्य टाईम्स
The administration should avoid a repeat of the 2013 sugarcane agitation
पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ऊसा व्यतिरिक्त पैसे मिळवून देणारे दुसरे पीक नसल्याने यावरच येथील लोकांचे जीवन अवलंबून आहे. गेल्या चार वर्षात साखरेचे दर जवळपास 1 हजार रुपयांनी वाढले. मात्र, ऊस दर 100 रुपयांनीही वाढला नाही. साखरेचे दर वाढल्यावर कारखानदारांनी स्वतःहून त्या पटीत किमान 500 ते 600 रुपये दर द्यायला हवा होता.

कराड : बळीराजाच्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मध्यस्थी करत प्रशासन व कारखाना अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. परंतु, या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास संघटनेला वेगळा विचार करावा लागेल. ऊस दरासाठी 2013 मध्ये झालेले  आंदोलन व त्याचे परिणाम सर्वज्ञात असून त्याची पुनरावृत्ती होऊ नये; याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.  
येथील प्रशासकीय इमारतीसमोर बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक रकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये ऊस दरासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. आज मंगळवारी 9 रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी प्राथमिक चर्चा केली. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बळीराजाचे प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ऊसा व्यतिरिक्त पैसे मिळवून देणारे दुसरे पीक नसल्याने यावरच येथील लोकांचे जीवन अवलंबून आहे. गेल्या चार वर्षात साखरेचे दर जवळपास 1 हजार रुपयांनी वाढले. मात्र, ऊस दर 100 रुपयांनीही वाढला नाही. साखरेचे दर वाढल्यावर कारखानदारांनी स्वतःहून त्या पटीत किमान 500 ते 600 रुपये दर द्यायला हवा होता. तो न दिल्याने शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करावे लागत असून त्याशिवाय कारखानदारांना दुसरी भाषा कळत नाही.
ते म्हणाले, प्रशासनाने मध्यस्थी करून ऊसदरप्रश्‍नी लेख परीक्षक वर्ग १ व विभागीय सहसाखर आयुक्त, सर्व कारखान्यांचे एमडी व आंदोलक शेतकरी यांची  गुरुवारी ११ रोजी दुपारी १२ वाजता कराड प्रांताधिकारी कार्यालयात संयुक्तिक बैठक आयोजित केली आहे. सदर बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास ऊस दरासाठी 2013 साली झालेल्या आंदोलनाचा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. आम्ही जरी धरणे आंदोलनास बसलो असलो; तरीही त्याचा वेगळा अर्थ प्रशासनाने काढू नये. आम्हाला वेगळ्या पद्धतीनेही लढा देता येतो. परंतु, ती पद्धत अवलंबण्याची वेळ कारखानदार, प्रशासनाने आमच्यावर आणू नये, असा इशाराही पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, बळीराजाच्या धरणे आंदोलनाला शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळत असून विविध भागातून हजारो शेतकरी आंदोलनस्थळी भेट देऊन समर्थन देत आहेत. तसेच विश्व इंडियन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी संघटना, भीम आर्मी आदी. संघटनांनीही आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कारखानदारांची युनिट वाढवण्याची चळवळ
पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांची भूक वाढत चालली असून ते ऊस दर वाढवण्याऐवजी स्वतःच्या कारखान्यांची युनिटे वाढविण्यावरच भर देत आहेत. त्यासाठी कारखानदारांकडून शेतकऱ्यांची वारेमाप लूट सुरू आहे. स्वतःच्या नातवाला, जावयाला कारखान्याचे नवे युनिट काढून देण्याची एकप्रकाची चळवळच कारखानदारांनी सुरू केली असल्याची टीका करत ही गोष्ट शेतकऱ्यांच्या विनाशाचे कारण ठरणार असल्याचे सूचक विधानही पंजाबराव पाटील यांनी यावेळी केले.

ऊस तोड न घेणे हेच हत्यार
शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ऊस तोड न घेता आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.  त्यामुळे आपणास प्रतिटन 3600 रुपये दर वाढवून मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना दगडफेक वा ऊस वाहतूक अडवण्याची गरज नसून त्यांनी फक्त स्वतः ऊस तोड न घेणे; हेच हत्यार बनवल्यास कारखानदार तात्काळ निर्णय घेऊन आपली मागणी मान्य करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER