Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

अभियंता दिनी जलशक्ती अभियान-कॅच द रेन व जलसाक्षरता अभियानांतर्गत जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 17 : अभियंता दिनी जलशक्ती अभियान-कॅच द रेन व जलसाक्षरता अभियानांतर्गत मेजर अतुल गर्जे सभागृह, सैनिक स्कूल सातारा येथे पाण्याचे जतन करणे नदी नाले, धरणामधील पाण्याचे प्रदुषण रोखणे, पाणी वापर संस्थेचे सक्षमीकरण करणे व जलसंधारण या विषयासंदर्भातील जाणीव जागृती  कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जलसंपदा विभागाच्या सातारा सिंचन मंडळाचे  अधीक्षक अभियंता   संजय डोईफोडे,  उपजिल्हाधिकारी (रोहयो)  विजया यादव,  सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार, धोम कालवे विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता विकास पाटील,   जिल्हा जलसंधारण अधिकारी अरूणकुमार दिलपाक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी  उपस्थितांना मार्गदर्शन करुन जलसाक्षरता - जलप्रदूषण या विषयी जाणीव जागृतीचे महत्व विषद केले.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष अधीक्षक अभियंता संजय  डोईफोडे   यांनी  जलसाक्षरता, जलप्रदूषण या विषयी तसेच पाणी वापर संस्थांचे महत्व या विषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. 

 वाल्मी औरंगाबादचे सेवा निवृत्त व्याख्याते बी.एम.शेटे यांनी पाणी वापर संस्थेची ओळख, स्ंस्थेची स्थापना व दैनंदिन कामकाज यावरील व्याख्यान दिले.पाणी वापर संस्थांची आवश्यकता, फायदे, संस्था स्थापन करणेचे कायदेशीर बंधन व कामकाज इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सहकार कायदा 1960 मधून महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन 2005 कायदयानुसार पाणी वापर संस्थेचे रूपांतरण, रुपांतरणाची गरज, फायदे व कार्यपद्धती, सन 2005 चा महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन  कायदा येणेपूर्वी स्थापन झालेल्या पाणी वापर संस्था सहकार कायदा सन 1960 नुसार स्थापन झालेल्या आहेत परंतू आता त्या पाणी वापर संस्था म.सिं.प.शे.व्य.सन 2005 या कायद्यामधील तरतूदीनुसार  रुपांतरीत करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने त्याबाबतची कार्यपध्दती व अशा रुपांतरणाची गरज, फायदे याविषयी मार्गदर्शन केले.

 जलयोध्दा कोल्हापूर उदय गायकवाड यांनी जलप्रदूषण कसे व कोणकोणत्या मार्गानी होते व त्यास आळा घालण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे कसे आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले.  त्यांनी कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा नदीचे जलप्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या पध्दतीने टप्या-टप्याने काय उपाययोजना राबवल्या त्या बाबतचा आराखडा व केलेल्या उपाययोजनांचे संक्षिप्त सादरीकरण केले.  यावर्षीच्या अनंत चर्तुदशी दिवशी नदी-नाले / तलाव जलाशयामध्ये होणारे निर्माल्य व गणेश विसर्जन पूर्णपणे रोखण्यासाठी जिल्हाभर गट निर्माण करुन सुमारे 3.25 लाख मुर्त्यांची व निर्माल्याची पर्यावरण पूरक दृष्टीने विल्हेवाट लावली असेही सांगितले.

 जलयोध्दा नाशिक अध्यक्ष महात्मा ज्योतिबा  फुले कालवा पाणी वापर संस्था ओझरत् ( मिग ) गोवर्धन कुलकर्णी यांनी पाणी वापर संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे फायदे व त्यांनी त्यांचेकडील पाणीवापर संस्थेने अवलंबलेले कांही मार्ग याबाबत मार्गदर्शन केले. पाणी वापर संस्था क्रियाशील राहणे हे संस्थेस निर्धारित केलेला पाणी कोटा अबाधीत राखणेसाठी कसे गरजेचे आहे. तसेच पाण्याचे काटकसरीने व पूर्ण कार्यक्षमतेने वापर होण्याच्या दृष्टीने कसे गरजेचे आहे ही बाब अधोरेखित केली.   पाणी वापर संस्था शेतीपुरक व्यवसायांचा अवलंब करून पाणी वापर संस्थेची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल बाजारभावाच्या अवस्थेतही कशी उंचाऊ शकते याबाबतही  त्यांनी उदाहरणासह  विशद केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता अशोक  पवार यांनी केले तर जलयोध्दा जलसाक्षरता समिती, सातारा प्रदीप पाटणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER