Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच सत्तेत मानाचं स्थान : ना.शंभूराज देसाई

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर मारुल हवेली ते दिवशी बुद्रुक रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम
टीम : धैर्य टाईम्स
Honorable place in power only due to the support of loyal and sincere workers: Shambhuraj Desai
तालुक्यामध्ये गावा-गावांत असलेल्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मानाचं स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

दौलतनगर : पाटण मतदारसंघामध्ये राजकीय वाटचाल करत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागला, संघर्ष करावा लागला. असे असतानाही गावा-गावांमध्ये निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते यांची मजबूत फळी प्रत्येक गावांमध्ये निष्ठेने काम करत होती. काहीवेळा पराभव झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना नाहक त्रासही झाला. पण कार्यकर्ते डगमगले नाहीत. त्यांनी नाहक त्रास सहन केला. पण मनामध्ये संघटनेबाबतची निष्ठा कायम ठेवली. तालुक्यामध्ये गावा-गावांत असलेल्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मानाचं स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मारुलहवेली ते दिवशी बुद्रुक या रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी  बोलत होते.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, ॲड. डी.पी.जाधव, ॲड. बाबूराव नांगरे, अधिक पाटील, संचालक पांडूरंग नलवडे, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, दादा जाधव, बाळासो सुर्यवंशी, अशोक सुर्यवंशी, सखाराम पाटील, बबनराव सुर्यवंशी, व्ही.जी.डोंगरे, बाळासो डोंगरे, प्रशांत चव्हाण, आनंदा पाटील, हणमंत सुर्यवंशी, श्रीमंत डोंगरे, टी.पी.कदम, एकनाथ गवळी, रामभाऊ महापूरे, प्रल्हाद महापुरे, भगवान महापुरे, राजाभाऊ सुर्यवंशी, पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
ना. देसाई पुढे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावे व वाडया-वस्त्यामधील सामान्य माणसांच्या उन्नतीसाठी व प्रगतीकरीता मंत्रीपदाच्या कालावधीत अनेक धाडसी निर्णय घेतले. शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावल पाहिजे हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. त्याकाळात नोकरीसाठी बाहेरगावी जाण्याची पध्दत होती,मिळेल त्या ठिकाणी मोल मजुरी करायची आणि कुटुंबाचा उदर-निर्वाह करण्याची मानसिकता माणसांच्यामध्ये होती.त्यामुळे खेडो-पाडयात शिक्षणाच्या सुविधा झाल्या पाहिजेत, त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातातून शेतकरी समृध्द झाला पाहिजे ही दूरदृष्टीचा त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई यांची होती. कोयना नदीवर 25 उपसा जलसिंचन उभारल्या.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या उपसा योजनांना मदत करुन निश्चितपणे शेतकऱ्यांच्या उन्नतीकरीता स्व.लोकनेते साहेब व स्व. शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांनी त्या काळात प्रयत्न केला असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,पाटण तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये पहिल्यापासून आपण संघर्ष केला. दिवशी बुद्रुक सारख्या गावाचा विचार केला तर कै.शिवराम पाटील (नाना) व कै.प्रेमनाथ पाटील (तात्या) हे ज्येष्ठ कार्यकर्ते या गावांमध्ये संघटना टिकवण्याचे व वाढविण्याचे प्रामाणिक काम करत होते. निवडणूकींमध्ये पराभव झाला की या मंडळींना नाहक त्रास दिला जायचा,पण हे कार्यकर्ते डगमगले नाहीत. त्यांनी निष्ठा कायम ठेवली. परंतू दिवशी हे गाव विकासापासून वंचित का राहिलं याचाही सामान्य जनतेने विचार करणे गरजेचे आहे.सन 2004 साली आमदार झाल्यानंतर विरोधी बाकावर असतानाही 250 कोटींची विकास कामे केली. सन 2014 ते 2019 याकाळात 1800 कोटींची विकास कामे केली. त्यासाठी विकासाची दूर दृष्टी ठेवून काम करण्याची तळमळ असावी लागते.सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादने कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे सन 2019 साली पुन्हा आमदार झालो,मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृतवाखाली  राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देत महत्त्वाच्या पाच खात्यांची जबाबदारी आपल्यावर पडली. माझ्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प विधान परिषदेमध्ये सादर केला. त्यानंतर कोविड 19 या आजारामुळे संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले. असे असले तरी पहिल्या टाळेबंदीच्या काळात गृहविभागाची जबाबदारी 13 तर दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्हयांमध्ये दौरा केला. जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचारी यांचे कामाचे ठिकाणी जाऊन त्यांच्या अडचणींची विचारपूस केली, त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला.
मंत्री झाल्यानंतर जनतेच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. त्याही अपेक्षा जबाबदारीने पूर्ण करण्याचं काम यापुढील काळात करायचे आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ज्या सामान्य शिवसैनिकांमुळे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे आपण या पदापर्यंत पोहोचलो आहे,त्या शिवसैनिकांना व कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण ठेवली आहे.मंत्रीपद हे लोकांची काम करण्यासाठी असून कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहून सामान्य जनतेचे प्रयत्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. आपल्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे संस्कार असून त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा जोपासत सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याठी तसेच गावा-गावांतील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी वित्त राज्यमंत्री म्हणून आपल्या मतदारसंघाला विकास निधीमध्ये नेहमीच यापुढे झुकते माप दिले जाईल.तसेच दिवशी गावातील प्रलंबित विकास कामांसाठी भरघोस निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.
प्रास्ताविक दादा जाधव,स्वागत आप्पासो राक्षे यांनी केले तर आभार जालिंदर डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमास दिवशी बुद्रुकसह आसपासच्या गावातील, विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER