Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू

विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ

टीम : धैर्य टाईम्स

जीवनाच्या प्रवासात अनेक नाती जोडली जातात. आई-वडील, भाऊ-बहिण, पत्नी अशी नाती आपल्याला जन्मतः मिळतात; पण मनाच्या जवळ जाणारे एक वेगळे नाते असते ते म्हणजे मैत्री. मनातल्या भावना, आयुष्यातील अडचणी, दुःख-सुख ज्या व्यक्तीसमोर आपण निःसंकोचपणे मांडू शकतो आणि ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतो, असा जिवाभावाचा मित्र आयुष्यात असणे ही मोठी भाग्याची गोष्ट असते. अशाच विश्वासार्ह मैत्रीचे उदाहरण म्हणजे पत्रकार अनिल पिसाळ.

जात-पात, धर्म-पंथ यांच्या पलीकडे जाऊन मनाने मनाशी जुळणारे नाते म्हणजे मैत्री. बालपणीचे सवंगडी, शालेय-महाविद्यालयीन मित्र आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटणारे सहप्रवासी यामध्ये काही जण खास बनतात. अनिल पिसाळ सर हे त्यापैकीच एक जिवलग मित्र.

एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून झालेली ओळख… सुरुवातीला फक्त बातम्या आणि फोटोंची देवाण-घेवाण. पण ही साधी ओळख हळूहळू मैत्रीत रूपांतरित झाली. जणू अनेक वर्षांची ओळख असल्यासारखे रोजचे संवाद, कुटुंबियांची विचारपूस आणि आयुष्य अधिक चांगले कसे घडवता येईल याबाबतचे सकारात्मक विचार हे त्यांच्या मैत्रीचे वैशिष्ट्य.

साखरवाडी सारख्या ग्रामीण भागातून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अनिल पिसाळ हे एक हसतमुख आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी त्यांचा जवळचा संपर्क आहे. त्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रात काम करताना त्यांची वेगळी शैली आणि हातोटी दिसून येते.

शेतकरी कुटुंबात जन्म असूनही आधुनिकतेची कास धरत उज्ज्वल भविष्याच्या दिशेने झेप घेण्याची त्यांची जिद्द उल्लेखनीय आहे. सतत कामात व्यस्त राहणे, वेळेचे महत्त्व ओळखणे आणि प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणे हा त्यांचा स्वभाव. “वेळ वाया घालवू नका, कमी वेळेत मोठी झेप घ्या” हा त्यांचा सल्ला मित्रपरिवाराला नेहमी प्रेरणा देणारा ठरतो.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या कार्याला अधिक यश मिळावे आणि त्यांचे आयुष्य आनंद, समाधान व यशाने भरून जावे, अशी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना.

अनिल पिसाळ यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

– शुभेच्छुक

सचिन संपत मोरे

संपादक – धैर्य टाईम्स

राज्य प्रतिनिधी – प्रिंट व डिजिटल पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER