Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

‘प्राज’च्या बायोसिरप तंत्रज्ञानाचे जयवंत शुगर्सवर ग्लोबल लॉन्चिंग उत्साहात

या नव्या तंत्रज्ञानामुळे वर्षभर ऊसाचा रस साठवून इथेनॉलची निर्मिती करणे शक्य
टीम : धैर्य टाईम्स
Global launch of Praj's bio-syrup technology on Jaywant Sugars
साखरेच्या हंगामाशिवाय इतरवेळी वर्षभर इथेनॉल उत्पादनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘बायोसिरप’ या नव्या शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती पुणे येथील प्राज इंडस्ट्रीजने केली आहे. जागतिक स्तरावर पहिल्यांदाच बनलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचे ग्लोबल लॉन्चिंग धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सच्या कार्यस्थळावर मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

कराड : साखरेच्या हंगामाशिवाय इतरवेळी वर्षभर इथेनॉल उत्पादनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘बायोसिरप’ या नव्या शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती पुणे येथील प्राज इंडस्ट्रीजने केली आहे. जागतिक स्तरावर पहिल्यांदाच बनलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचे ग्लोबल लॉन्चिंग धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सच्या कार्यस्थळावर मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
व्यासपीठावर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, भारत सरकारच्या मुख्य साखर संचालक संगीत सिंगला, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, संचालक तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. बबनराव शिंदे, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी, जयवंत शुगर्सचे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आदी मान्यवर होते.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, की सन २००३ साली केंद्र सरकारने इथेनॉल पॉलिसी आणली. बायोसिरप या तंत्रज्ञानामुळे साखर उद्योग पूर्ण वर्षभर चालणार असल्याने, त्याचा फायदा ऊस उत्पादकांना नक्कीच होईल. जगाला पर्यायी इंधनाची मोठी गरज असून, ऊसाचे पीक संपणार असल्याने, या नव्या तंत्रज्ञानामुळे साखर उद्योगालाही चांगले दिवस येतील.
साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, की महाराष्ट्रात साखर उद्योगांनी समृद्धी आणली. पण आता साखरेचा वापर कमी होऊ लागल्याने त्याचा साखर उद्योगावरही परिणाम होत आहे. त्यामुळे आता साखरेऐवजी पर्यायी उत्पादनांचा विचार व्हायला पाहिजे. ना. नितीन गडकरी यांनी इथेनॉल निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न केला असून, गेल्यावर्षी महाराष्ट्रात ८५ कोटी लिटर इथेनॉल बनविण्यात आले. यावर्षी त्यामध्ये आणखी ४० कोटी लिटर वाढविण्याचा विचार आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांपेक्षा इथेनॉलवरील वाहनेच जास्त पर्यावरणपूरक आहेत, असा सूर जगभरात उमटत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी बायोसिरप या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत, इथेनॉल निर्मितीला चालना द्यावी.
जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी बाजारपेठेतील साखरेच्या दरातील चढउतार ही संपूर्ण जगभर भेडसावणारी समस्या आहे. अशावेळी साखर कारखान्यांनी साखरेऐवजी उपपदार्थाच्या निर्मितीकडे वळायला हवे. इथेनॉल निर्मितीबाबत ना. गडकरीसाहेब महत्वाकांक्षी असून, येत्या काळात पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलला महत्व येणार आहे. अशावेळी बायोसिरप तंत्रज्ञान ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.
‘प्राज’चे संस्थापक चौधरी म्हणाले, ग्रामीण अर्थकारणाला बळ देण्यासाठी प्राज इंडस्ट्रीज नेहमीच प्रयत्नशील राहिली असून, विविध प्रकारच्या बायोप्रॉडक्टच्या उत्पादनांसाठी आग्रही राहिली आहे. साखर उद्योगात वर्षातील ठराविक काळातच कारखान्यांचा हंगाम राबविला जातो. अशावेळी उर्वरित वर्षात इथेनॉल निर्मिती करायची झाल्यास हंगाम संपल्याने व ऊसाची उपलब्धता न झाल्याने अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणून साखरेच्या हंगामाशिवाय इतरवेळी वर्षभर इथेनॉल उत्पादनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘बायोसिरप’ या नव्या शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती आम्ही केली आहे. या नव्या ‘बायोसिरप’ तंत्रज्ञानामुळे आता वर्षभर ऊसाचा रस साठवणे शक्य होणार असून, साखर हंगामाच्या पलीकडे वर्षभर इथेनॉलची निर्मिती करणे शक्य होणार आहे.
यावेळी ‘प्राज’चे अतुल मुळे आणि वसंतदादा शुगर्स इन्स्टिट्यूटचे एस. व्ही. पाटील यांनी बायोसिरप तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. तसेच रेणुका शुगर्सचे प्रेसिडेंट रवी गुप्ता यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला गुरूदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, कार्यकारी संचालक राहुल घाटगे, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, श्री. विनायक भोसले यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, प्रकाश नाईकनवरे, विद्याधर अनासकर यांच्यासह विविध साखर कारखान्याचे संचालक, अधिकारी व तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट चारुदत्त देशपांडे यांनी स्वागत व आभार मानले.

प्रयोगशील कारखान्यांत जयवंत शुगर्स महाराष्ट्रात एक नंबरला!
प्राज इंडस्ट्रीजने साखर उद्योगासाठी अनेक नवनव्या तंत्रज्ञानाचे संशोधन केले आहे. या संस्थेने जयवंत शुगर्सच्या साथीने तयार केलेले बायोसिरप तंत्रज्ञान अव्वल दर्जाचे असून, प्रयोगशील कारखान्यांत जयवंत शुगर्स महाराष्ट्रात एक नंबरला आहे, असे गौरवोद्गार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER