फलटण प्रतिनिधी :
आरडगाव, ता. फलटण येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २५ मे रोजी पंचशील बुद्धविहार येथे बुद्ध मूर्ती स्थापना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय भूमिपूजन असा संयुक्त कार्यक्रम धो-धो कोसळणाऱ्या अवकाळी पाऊसात मोठया उत्साहात संपन्न झाला. ना. आठवले यांच्या हस्ते पंचशील बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा यावेळी संपन्न झाला. तर दुपारच्या सत्रात सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी भन्ते धम्मबोधी (लोणंद ) यांनी बौद्ध रितिरिवाजप्रमाणे धम्म विधी पार पाडला. यावेळी माजी आमदार दीपकराव चव्हाण यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रमोद काकडे यांनी केले.
मॉन्सूनपूर्व पावसाने ऐन उन्हाळ्यात फलटण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले तर नदी, ओढे, नाले दुथडी भरून वाहत असताना आरडगावकरांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. रविवार दिनांक २५ मे रोजी सकाळी बुद्ध मूर्ती रथात ठेवून धम्म रॅली काढण्यात आली. यावेळी धो - धो कोसळणाऱ्या पावसात अबाल वृद्धांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम प्रसंगी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड, मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अण्णा वायदंडे, सूर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर, विजय येवले, राजू मारुडा,संजय निकाळजे, सतीश प्रतीक गायकवाड, सतीश अहिवळे, लक्ष्मण अहिवळे, तेजस काकडे, अक्षय साळवे, संदीप इंगळे यासह आरडगावचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
ना. आठवले यांच्याकडून कौतुक
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांनी अवकाळी पाऊसात एवढ्या मोठ्या उत्साहात आरडगावकरांनी धार्मिक कार्यक्रमासह बुद्ध विहार वाचनालय अशा कार्यक्रमाचे कौतुक केले.
प्रचंड पावसात विनाछत्री धम्म रॅली
सातसे हून अधिक महिला, पुरुष यांच्यासाह लहान मुले-मुली वृद्ध प्रचंड पावसात धम्म रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी एकाही व्यक्तीने छत्री घेतली नाही.