संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि.26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापर्यंत (समता पर्व) अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.2 डिसेंबर 2022 रोजी समता पर्वानिमित्त उपस्थितांना अंधश्रद्धा निर्मूलन या विषयी मार्गदर्शन प्रबोधन व प्रात्यक्षिक दाखविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सातारा जिल्ह्याचे सक्रिय कार्यकर्ते डॉ. उदय चव्हाण व डॉ. माने यांनी भोंदू बाबा पासून सावध राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे उपस्थित होते. या प्रसंगी श्री. उबाळे म्हणाले, युवकांनी गंडेदोरे यांच्यावर विश्वास न ठेवता स्वत:च्या मन, मेंदू आणि मनगटावरती विश्वास ठेवून स्वत:बरोबर समाज हित साधण्यासाठी कटिबद्ध रहावे.
















