Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत

कराड तालुक्यात लवकरच 110 बेडची व्यवस्था होणार

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली
टीम : धैर्य टाईम्स
कराड : येत्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण बहुऊद्देशीय हॉल, वडगाव हवेली ग्रामीण रुग्णालय, उंडाळे ग्रामीण रुग्णालय या 3 ठिकाणी 110 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे व येथेच कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. यापुढेही जशी गरज पडेल तशी बेड संख्या वाढविले जातील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊन ऑक्सिजन च्या तुटवड्याबाबत यावर उपाय म्हणून सरकारी जागांमध्ये ऑक्सिजन फिलिंग स्टेशन उभा करण्याबाबत तसा अहवाल दयावा अश्या सूचना आ. चव्हाण यांनी प्रशासनास दिल्या. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. याअनुषंगाने प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची तयारी करण्यात आली आहे तसेच काय अपेक्षित आहे यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांशी चर्चा करून आढावा घेतला. यावेळी आढावा बैठकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाच्या सद्य परिस्थितीतील बेडची उपलब्धता, रेमडीसीव्हर इंजेक्शन चा पुरवठा, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका तसेच लसीकरण मोहीम कश्या प्रकारे राबविली जात आहे या विषयांवर आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यात 12 हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल, शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटल, स्व.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड हॉस्पिटल, राजश्री हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, क्रांती सर्जिकल, कोयना हॉस्पिटल, सह्याद्री ऍग्री इंजिनिरिंग, देसाई हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल आदी हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या सर्व हॉस्पिटल मध्ये आजच्या तारखेला 866 इतक्या बेडची तयारी केली गेली असून यामधील सद्या 183 बेड उपलब्ध आहेत. बेडच्या संख्येबाबत रोजची माहिती उपलब्ध करण्याबाबत सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या. याचसोबत कराड तालुक्यातील तथा जिल्ह्यातील हॉस्पिटलना ऑक्सिजन चा तुटवडा भेडसावत आहे. यासाठी आ. चव्हाण यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच कराड मधील काही हॉस्पिटल ना सुद्धा संपर्क साधून त्यांच्याकडे किती प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे याची माहिती घेतली. या माहितीमध्ये एकंदरीतच ऑक्सिजनचा साठा कमी आहे असे दिसल्यावर आ. चव्हाण यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी तसेच अन्न व औषध विभागाच्या सचिवांशी संपर्क साधून जिल्ह्यातील ऑक्सिजन च्या पुरवठ्याबाबत माहिती घेतली यानुसार जिल्ह्यासाठी 7 टँकर पाठविले जात आहेत अशी माहिती देण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, प्रशासनासोबत घेतलेल्या आढावा बैठकीत बेडच्या उपलब्धतेबाबत, ऑक्सिजन च्या पुरवठ्याबाबत, रेमडेसीव्हर इंजेक्शन पुरवठा यासह लसीकरण मोहीम कश्या प्रकारे चालू आहे याची माहिती घेतली. तसेच तालुक्यात लसीकरण सगळीकडे व्यवस्थित होत आहे. पण लसींचा पुरवठा मर्यादित असल्याने अडचण भासत आहे परंतु प्रशासनाने दिवसाला 15000 जणांना लस देऊ शकतो अशी यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे पुरेशी लस ज्या ज्या वेळी उपलब्ध होईल त्यावेळी लसीकरण मोहीम चांगल्या प्रकारे राबविता येईल. सद्य कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे आपण लॉकडाऊन चा पर्याय घेत आहोत हे टाळण्यासाठी सर्वांनी मास्क चा वापर करावा, कायम हात साबणाने धुवावेत तसेच किमान अंतर राखले पाहिजे असे आवाहन सुद्धा यावेळी आ. चव्हाण यांनी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER