फलटण | धैर्य टाईम्स | 5 जुलै 2025
सामाजिक क्षेत्रामध्ये अनेकांना मदतीचा हात देणारे फलटण येथील दानशूर व्यक्तिमत्व युवा उद्योजक संग्राम अहिवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनू संग्राम अहिवळे यांनी प्रशालेची गरज ओळखून मंगळवार पेठेतील फलटण नगर परिषदेची शाळा क्र 3 ला सब मर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट म्हणून दिली.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी मुकाडे,उपशिक्षक हिरामण मोरे, बंडू यादव, शिवाजी जाधव, महिला शिक्षक चैत्राली कांबळे, अंगणवाडी सेविका सारिका काकडे, अंबिका काकडे, प्रिती रणजित रोकडे, युवा नेतृत्व रोहित माने, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मा.अध्यक्ष सागर अहिवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या डिझीटलायझेशनचे व संपूर्ण शाळा व्यवस्थापनाचे कौतुक करतानाच प्रशालेला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी अहिवळे दांपत्यांनी दिले. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक बालाजी मुकाडे यांनी संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे स्वागत केले.
यावेळी युवा उद्योजक विशाल गुंजाळ, तेजस भोसले, मुकुल अहिवळे, रवी मोरे, आदित्य साबळे, संतोष कांबळे, तुषार कोकाटे, गणेश काकडे, गणेश पवार, प्रकाश काकडे, मोनू कोकाटे, सोहम जगताप, जीत जगताप, निखिल काकडे, प्रशांत अहिवळे, आर्यन काकडे, नीरज लगाडे, अनुज काकडे, मुस्ताक कोतवाल , माऊली काकडे, समद कोतवाल, रुद्र लगाडे, दादा काकडे, केतन अहिवळे, निरंजन अहिवळे, सम्यक काकडे, अझीम शेख तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. उपशिक्षक हिरामण मोरे सर यांनी आभार मानले.