फलटण प्रतिनिधी :
डसऱ्याक असोसिएशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन फलटण या संस्थेच्या वतीने दिनांक 28 जून 2025 रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या फलटण येथील पालखी सोहळा मुक्कामाच्या दिवशी येणाऱ्या वारकरी माऊलींना मोफत चहा, पाणी व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रातील काही दानशूर व्यक्तींनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला त्या सर्वच देणगीदारांचे संस्थेचे विश्वस्त ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात व डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात यांनी अभिनंदन केले आहे.