फलटण प्रतिनिधी :
आपण सर्व जिल्हाभर दौरा करत असून सर्व नवे जुने काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रित आणून काँग्रेसला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले. ते फलटण येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. फलटण तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना निश्चितपणे बळ देऊ असे आश्वासन यावेळी देशमुख यांनी दिले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी- बेडके शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज पवार,
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक फलटण येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी- बेडके शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज पवार, सरचिटणीस शंकरराव लोखंडे, सुनील नेटके, युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रितम जगदाळे, तालुका अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष ताजुद्दीन बागवान, शहराध्यक्ष अल्ताफ भाई पठाण, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विकास ननवरे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी - बेडके यांनी फलटण तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काँग्रेसच्या वतीने चालू असलेल्या कामांसाठी शासकीय स्तरावर केलेली मागणी व त्या संदर्भात होत असलेला पाठपुरावा याची माहिती दिली. तसेच तालुक्यामध्ये काँग्रेस आगामी निवडणुकांमध्ये सर्व जागा लढवणार असल्याचे सांगितले.
यावेळी हणमंत लोंढे (बरड) व दशरथ जाधव (ढवळ) यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा कमिटीचे अध्यक्ष झाल्याबद्दल फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रणजीत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली यात काँग्रेसचे संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. या आढावा बैठकीस जिल्हा तसेच काँग्रेसचे पदाधिकारी मनोहर गायकवाड, बाल मुकुंद भट्टड,अमरसिंह बेडके,निळकंठ निंबाळकर,आर पी भोसले,अच्युत माने सोहराब खान, अभिजीत जगताप, हरीश बेडके अमित फाळके, चैतन्य पवार, म्हणजे खान मिटकरी, अजय बेडके, दिलीप आवारे, यजुवेंद्र घोरपडे, अतुल कोकणे, भारत अहीवळे, अजय इंगळे, अभिलाष शिंदे, सुधीर शिंदे, धनंजय गोरे, प्रवीण अडसूळ, संतोष बोबडे, संतोष बाचल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर काँग्रेसचे अध्यक्ष पंकज पवार यांनी केले तर प्रीतम जगदाळे यांनी आभार मानले.