फलटण | धैर्य टाईम्स |
धुळदेव ग्रामपंचायतचे ( ता. फलटण ) माजी सरपंच सुभाष शिंदे, यांच्यासह सेवानिवृत्त प्राचार्य दिलीपराव शिंदे व रेशनिंग संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब पोतदार, महात्मा फुले समता परिषदेचे दीपक साळुंखे व प्रवीण बनकर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर,युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. धुळदेवच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अमित रणवरे, बापूराव शिंदे, लक्ष्मण सोनवलकर, बाळासाहेब ननावरे, सचिन महामुनी, चैतन्य खरात, सुहास भांडवलकर, गणेश धायगुडे, गणेश खरात, अतुल पोळ,रवी मदने,प्रवीण बनकर,सागर सोनवलकर, मधुकर पंढरी, ऋतिक ननावरे, मिलिंद खरात, गणेश खरात, किरण धर्माधिकारी उपस्थित होते, आभार चैतन्य खरात यांनी मानले.