फलटण प्रतिनिधी : फलटणचे माजी नगराध्यक्ष कै. नंदकुमार आबाजी भोईटे यांची संत ज्ञानेश्वर माऊली सोहळ्यातील वारकऱ्यांची अन्नदान सेवा त्यांच्या भोईटे कुटुंबीयांनी आजही सातत्याने सुरूच ठेवली आहे.संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे फलटण येथील आगमन प्रसंगी वारकऱ्यांना भाकरी, वांग्याची भाजी, मिरची खरडा व मुबलक शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी जेष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव, अमित भोईटे व भोईटे कुटुंबीय उपस्थित होते.