Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - विठ्ठल नामाचे उच्चारण हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी आहे. तर 

मुलांमध्ये लहान पणापासूनच संस्कार आणि भक्तिभाव रुजविण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी दर्शन सोहळ्या सारखे उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरतील असा विश्वास प्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डॉ.प्रसाद जोशी यांनी व्यक्त केला. ते महात्मा एज्युकेशन सोसायटीचे श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय फलटणच्या विदयार्थ्यांनी वेशभूषा परिधान करून महात्मा फुले चौक येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शन सोहळा सादर केला त्या प्रसंगी बोलत होते. यावेळीसंस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.


विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक जाणीव रूजवण्यासाठी प्रशालेच्या वतीने सातत्याने घेतले जाणारे उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून अशा उपक्रमातून शाळेचे वेगळेपण सातत्याने सिद्ध होत आहे असे गौरवोद्गार संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ यांनी काढून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाच्या मार्गावर महात्मा एज्युकेशन सोसायटीचे श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय फलटणच्या विदयार्थ्यांनी वेशभूषा परिधान करून महात्मा फुले चौक येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शन सोहळा सादर केला. हा दर्शन सोहळा वारकऱ्यांसह भाविक भक्तांना भावल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. 

 

दरम्यान दिंडीतील वारकरी भाविक यांनी माऊली..माऊली,विठ्ठल..विठ्ठल जयघोष करत सोहळयाचे स्वागत करून त्यांना वारीत साक्षात विठ्ठल भेटल्याची अनुभूति मिळाली.


प्रारंभी या दर्शन सोहळयाचा शुभारंभ फलटणचे सुप्रसिध्द अस्थीरोगतज्ञ डॉ.प्रसाद जोशी यांनी सपत्नीक श्रीफळ वाढवून केला. यावेळी संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ,श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे चेअरमन रविंद्र बर्गे,मुख्याध्यापक मनीष निंबाळकर (प्राथमिक),भिवा जगताप (माध्यमिक) आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.


 आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील प्रसाद मठपती याने विठ्ठलाचा आणि दिक्षा गायकवाड हिने रूक्मिनीची वेशभूषा करून शहरातील पालखी मार्गावर महात्मा फुले चौक येथे हा देखावा सादर केला.हा विठ्ठल-रुक्मिणी दर्शन सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.या सोहळयामुळे पालखीच्या रथापुढील आणि रथामागील दिंडयांतील वारकऱ्यांसह शहरातील भाविक भक्तांना वारीत साक्षात विठ्ठल-रूक्मिनी भेटल्याची अनुभूति मिळाली.

पालखी सोहळयाच्या रथातील विश्वस्तांनी पालखीतील हार या देखाव्यातील विठ्ठल-रुक्मिणीला परिधान करण्यासाठी दिल्याने हा देखावा विश्वस्तांनाही भावल्याची प्रचिती आली. अनेकांना या विठ्ठल-रुक्मिणी सोबत फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह आवरत आला नाही. भाविक भक्त नतमस्तकही होत होते, तर काहींना दान करण्याचा मोह झाला. हा दर्शन सोहळा वारकऱ्यांसह भाविक भक्तांच्या मनाला खूपच भावल्याने सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.

 

 दर्शन सोहळा यशस्वीतेसाठी मनीष निंबाळकर आणि भिवा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER