फलटण प्रतिनिधी :
महावितरण फलटण शहर तर्फे गेल्या 2 महिन्यापासून केलेल्या देखभाल व दुरुस्ती कामामुळे पालखी सोहळा फलटण मुक्कामी दरम्यान विना खंडित विज पुरवठा करण्यात आल्याची माहिती महावितरण अधिकारी रविंद्र ननावरे यांनी दिली.
महावितरण फलटण शहर शाखा अभियंता 1 चा अतिरिक्त कार्यभार व फलटण शहर शाखा 2 असे दोन्ही चार्ज असताना पालखी कालावधीत एकाही वेळा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणुन गेली 2-3 महिने महावितरण फलटण शहर तर्फे विविध देखभाल व दुरुस्ती तसेच नवीन AB केबल जुन्या तारा काढून बदलणे अशी कामे महावितरण अधिकारी रविंद्र ननवरे यांनी हाती घेतली व ती जबाबदारी व प्रामाणिकपणे प्रदीप ग्रामोपाद्य, कार्यकारी अभियंता व बाळासाहेब लोंढे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. फलटण शहरातील केलेली कामे पुढीलप्रमाणे.
- जुन्या तारा काढून पालखी मार्ग तसेच गर्दी च्या ठिकाणी AB केबल टाकली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, शिवाजी महाराज चौक, नाना पाटील चौक ते पंढरपुर रोड वरील पूर्ण LT लाइन जाळे काढले.
- रोहित्रच्या (Transformer) वितरण धोकादायक पेट्या शहरातील विविध ठिकाणच्या बदली केल्या व दुरुस्ती केल्या.
- HT लाइन व LT लाइन खालील वाढलेल्या झाडांच्या फांद्या व वेड्या बाबलि फांद्या व काढल्या.
- विविध ठिकाणी पूर्ण एरिया बंद राहू नये मनून AB स्विच टाकले व दुरुस्त केले. जेणे करून दुसऱ्या फिडर वरुण रिंग फीडिंग करता येईल.
- तसेच पालखी स्थळी पोलिस स्टेशन समोर लाइट गेली तर 1 मिनिट मध्ये विद्युत पुरवठा सुरू होण्या साठी चेंज over स्विच बसविण्यात आला.
- पालखी स्थळी फक्त 22 फलटण फिडर वरून ठेवून बाकी लोड ईतर Municipal व YC फिडर वरती वळविला. त्यामुळे पालखी स्थळी लोड जास्त झाला तरी एकही tripping आले नाही.
- मलठण याठिकाणी पालखी मार्ग मध्ये 22KV HT केबल खूप वेळा तुटली होती त्यामुळे रिंग फीडिंग करता येत नव्हते. त्याठिकाणी पालखी मार्ग ठेकेदार Electrical Contractor यांच्या कढून नवीन 22KV, 300 Sqmm HT 2 रन टाकून 2HT फिडर पिलर पण बसवला आहे. 1HT फिडर पिलर यास अडवणूक झाली आहे पण ते पण काम मार्गी लागेल कारण पूर्ण मलठण व फलटण विद्युत पुरवठा त्या केबल द्वारे होणार आहे. केबल टाकल्यामुळे रिंग फीडिंग व्यवस्थित होत आहे.
- .YC ग्राउंड याठिकाणी विद्युत अपघात होऊ नये यासाठी guarding केले आहे.
- वारकरी व लोकांना विद्युत अपघात होऊ नये म्हणून रोहित्र यास तारेची जाळी कंपाऊंड (Fencing) केले आहे तसेच पोलिस स्टेशन, महात्मा फुले चौक DP यास पत्र्याचा cover बसवला आहे.
- पालखी सोहळा मध्ये फ्यूज वायर, DO वायर, Lugs, कंडक्टर, 2शिल्लक रोहित्र(रोहित जळले तर लगेच बदलता येईल) अशी सर्व व्यवस्था व 25 ठेकेदार यांची Emergency लोक ठेवण्यात आलेली होती. जेणेकरून फॉल्ट झाला तर कमीतकमी वेळे मध्ये तो काढला जाईल.
- सातारा मंडळ कार्यालय मधून वायरमन व अधिकारी तसेच विभागीय कार्यालय यांच्या कढून Extra लोक नियुक्ती करण्यात आलेली होती.
त्यांचबरोबर महावितरण कढून अजून खूप ईतर कामे करण्यात आलेली आहेत. त्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग व वरील केलेल्या कामामुळे महावितरण अधिकारी व जनमित्र यांचे फलटण मध्ये कौतुक होत आहे.