मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज १० ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. विजय हे गेले दीड वर्ष ते कर्करोगाने त्रस्त होते.
त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना आता व्यक्त केली जातेय. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.











