महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदारांपैकी कोरेगावच्या आमदार महेश शिंदेंचा नंबर लागतो. कोरेगाव मतदारसंघातील जनता त्यांना अक्षरशः देवदूत म्हणून ओळखते याच्याच पार्श्वभूमीवर आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत कोरोनाला थोपविण्यासाठी आमदार महेश शिंदे हे अहोरात्र आपल्या कोविड हॉस्पिटलमध्ये काम करीत आहेत. कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांनी दोन भव्यदिव्य अशी कोविड हॉस्पिटल उभी करून कोरेगावच्या उत्तर भागासाठी अंबवडे येथे रघुकुल मंगल कार्यालयात तिसरे कोविड हॉस्पिटल उभे करीत आहेत. या कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णाला नुसते उपचार देवून घरी न पाठविता संपूर्णपणे बरा होईपर्यंत त्याची देखभाल केली जाते. याच्याच आधारे हे अंबवडे येथील सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल उत्तर कोरेगाव तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार असल्याचे मत पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद सदस्य राहुलबापू कदम यांनी व्यक्त केले. या तिसऱ्या कोविड हॉस्पिटलचे उदघाटन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सोमवारी 24 मे रोजी अंबवडे येथे संपन्न होणार असल्याचे कदम यांनी सांगितले.