सातारा जिल्ह्यातील होलार समाजाने राज्यातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेतलेल्या कार्याची नोंद इतिहास नक्कीच घेईल असा विश्वास प्रा. विजय केंगार यांनी व्यक्त केला ते फलटण येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. सातारा जिल्ह्यातील होलार समाजाच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा.विजय केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्याचे मा. अध्यक्ष नारायण आवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष बापुराव करे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र पार पडले.
यावेळी नारायण आवटे यांनी होलार समाजाच्या उत्कर्षासाठी स्थापन केलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला महाराष्ट्र शासनाकडून २०१४ पासून एकही रुपयाचा निधी उपलब्ध झाला नसल्याचे नमूद केले.
होलार समाजाचे युवा नेतृत्व संदीप गोरे यांनी सातारा जिल्ह्यातील युवा वर्ग समाजकार्यासाठी एकत्र येत असून तो निश्चितच नवक्रांती घडवेल तसेच राज्यातील सर्व समाज बांधव या विधायक कार्यासाठी सक्रिय सहभाग होईल असा विश्वास दाखवून तरूण सहकाऱ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आभार सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास करे, महेश जाधव, अनिल गोरे, विजय आवटे, गणेश जाधव, प्रविण जाधव, हर्षद केंगार, तेजस पवार, पत्रकार निलकुमार गोरे, पत्रकार सुरज गोरे आणि समाज बांधव उपस्थित होते.