फलटण : सचिन मोरे
पोलिसांनी कायदा हातात घेत योग्य न्याय दिला ? अक्षय शिंदे सारख्या आरोपीला योग्यच न्याय मिळाल्याची भावना जनमानसातून उमटत आहे. अशा आरोपींना सांभाळणे त्यांच्यावर लाखो - करोडो खर्च करणे, यापेक्षा अशा आरोपीला हाच योग्य न्याय असल्याची भावना जनमानसातून उमटत आहे.
अक्षय शिंदे याला रिमांडसाठी नेत असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार करताना त्याचा एन्काऊंटर झाल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. मात्र अक्षय शिंदे सारख्या आरोपीला मिळालेली शिक्षाही न्याय असल्याचे जनसामान्यांच्या कडून बोलले जात आहे.
या सर्व घटनांवर पोलीसांवर संशय व्यक्त करणे चुकीच असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी संरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्याचे म्हटले आहे. पोलिसांच्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर अक्षयच्या एन्काउंटरचे चौकशीच्या आदेश दिल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. पोलीस आयुक्तानी आठ जणांची चौकशी समिती नेमली आहे. तर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे चुकीचे असल्याचे म्मुख्यमंत्री यांचे म्हणणे आहे.
लहान मुलीवर बदलापूर येथे अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे सारख्या आरोपीला निसर्गानेच न्याय दिल्याची भावना जनसामान्यातून उमठू लागली आहे. त्यामुळे आज तरी महाराष्ट्रात आनंदोस्तव साजरा होत आहे.
बदलापूर येथे आरोपीच्या मृत्यूनंतर फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. अक्षय शिंदेला फाशी देण्यात यावी अशी मागणी बदलापूर येथे करण्यात आली होती. बदलापूरकरांची मागणी पूर्ण झाल्याची भावना आज दिसत आहे.











