Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान

फलटण तालुक्यात एकूण ७१.८३ टक्के मतदान
टीम : धैर्य टाईम्स

धैर्य टाईम्स - प्रतिनिधी 


फलटण तालुक्यात झालेल्या सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ७१.८३ टक्के मतदान झाले असून महिला मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. फलटण तालुक्यात सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपा राष्ट्रवादी युतीच्या विरोधात शिवसेना म्हणजे महायुतीतच खरी लढत झाली.भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सचिन पाटील व राष्ट्रवादीचे नेते शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व राष्ट्रवादी या युतीच्या विरोधात विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट अशी जिल्हा परिषदेचे आठ गट व पंचायत समितीच्या सोळा गणामध्ये लढत झाली. 


तरडगाव गटामध्ये भाजपाचे सूर्यकांत कृष्णा खरात व शिवसेना पक्षाचे गिरीश सुदाम बनकर यांच्यामध्ये सरळ लढत झाली असून साखरवाडी पिंपळवाडी गटामध्ये आरती दिनेश कांबळे, संचिता सागर कांबळे, रूपाली लक्ष्मण सरगर, प्रतीक्षा रोहन मोहिते, विडणी गटामध्ये ज्योती गौतम मोरे, सुषमा अविनाश मोरे आणि प्रतीक्षा विवेक मोरे, गुणवरे गटामध्ये ऋतुजा अभिजीत जगताप, हेमलता अनिल जगताप, प्रियंका मंगेश मोरे, बरड गटामध्ये वैशाली संदीप कांबळे, भाऊसाहेब पोपट मोरे, प्रेम जयश्री सुरेश मोरे, गंगाराम अरुण रणदिवे, रामदास विठ्ठल केंगार, अनिल विठ्ठल रणदिवे. कोळकी गटामध्ये अभिजीत विजय कदम, सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम, प्रदीप उर्फ प्रेम सुरेश मोरे, जयकुमार अरविंद शिंदे, काशिनाथ साधू शेवते, राजेंद्र अप्पा चोरमले. वाठार निंबाळकर गटामध्ये दुर्योधन सोमनाथ ननावरे, निलेश बापू लोखंडे, विष्णू किसन लोखंडे, खंडेराव पांडुरंग सरक, निवृत्ती अशोक खताळ तर हिंगणगाव गटामध्ये सारिका धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट, शितल सचिन झणझणे, किरण निलेश नलावडे, सुप्रिया लक्ष्मण सूळ हे उमेदवार आहेत. 


पंचायत समितीच्या पाडेगाव गणामध्ये अमोल बन्यासो खराडे, आकाश राजकुमार गायकवाड, राहुल दादासो नरुटे, नितीन बापूराव सुळ. तरडगाव गणामध्ये योगिता दीपक गायकवाड, स्मिता प्रशांत गायकवाड, शितल महादेव कुलाळ. साखरवाडी पिंपळवाडी गणामध्ये शिवांजली विक्रमसिंह भोसले, कमलताई शंकर माडकर. सस्तेवाडी गणामध्ये विजय आप्पासो भिसे, गणेश मल्हारी तांबे, ऋतुजा सागर कुंभार. सांगवी गणामध्ये सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे, सौ. सारिका संजय सोडमिसे. विडणी गणामध्ये सचिन गजानन अभंग, डॉ. किरण उत्तमराव शेंडे. गुणवरे गणामध्ये वनिता धनाजी आढाव, वैशाली अतुल कांबळे, ज्योती अनिकेत बागाव. आसूगणामध्ये भीमराव दामोदर पवार, संजय रघुनाथ पवार. बरडगणामध्ये स्वाती हनुमंत आटोळे, अनिता संतोष गावडे, साक्षी काशिनाथ शेवते. दुधेबाबी गणामध्ये मनीषा लक्ष्मण सोनवलकर, विजया हनुमंत सोनवलकर, मयुरी भाऊसो सोनवलकर. कोळकी गणामध्ये अशोक गेनबा नाळे, विकास अशोक नाळे, सुनील गंगाराम सोनवलकर, ज्ञानदेव सावता शिंदे. जाधववाडी गणामध्ये अमोल दशरथ सस्ते, युवराज नरसिंग सस्ते, निर्भय चंद्रकांत काकडे. वाठार निंबाळकर गणामध्ये स्वाती विकास तरटे, अश्विनी किरण यादव, शुभांगी तुकाराम शिंदे, संजना संतोष करे. सुरवडी गणामध्ये महेंद्र विठ्ठल घाडगे, किरण लक्ष्मण साळुंखे, धनंजय प्रल्हादराव साळुंखे, लक्ष्मीकांत धनसिंग लांडगे, रणजीत सिताराम मोहिते, सासवड गणामध्ये संतोष हनुमंत खताळ, संतोष अंकुश कारंडे, हिंगणगाव गणामध्ये सीमा शरद भोईटे इनामदार, व सीमा सुरेश भोईटे यांच्यामध्ये लढत झाली. 

या सर्व लढतीपैकी कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये माजी आमदार चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम आणि भारतीय जनता पार्टीचे जयकुमार अरविंद शिंदे यांच्या लढती बरोबरच तालुक्यातील सर्व लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे.    

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे येथे आपला मतदानाचा हक्क बजावून

लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय

सहभाग घेण्याचे आवाहन केले, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सुरवडी येथे आपल्या कुटुंबासहित मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सुरवडीच्या सरपंच शरयु साळुंखे पाटील उपस्थित होत्या. फलटण तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर लाडक्या बहिणींनी रांगा लावून मतदान केले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली.


तडवळे येथे एका नववधूने लग्नमंडपात जाण्यापूर्वी नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावत मतदानाचा हक्क पार पाडला. विवाहाच्या आनंदी क्षणांपूर्वीच तिने लोकशाहीप्रती आपली जबाबदारी जपल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. याचप्रमाणे सोनवडी येथेही एका नववधूने विवाहसोहळ्याच्या दिवशी मतदान करून आदर्श उदाहरण घालून दिले.


ढवळ येथे मतदान यंत्र खूप धिम्या गतीने चालत होते, त्या नंतर ते बंद पडल्याने काही काळ तिथं गोंधळ उडाला होता.तसेच मुंजवडी येथेही मशीन बंद पडले होते.


चक्क दारूचे दुकान मतदानादिवशी सुरु असल्यामुळे पोलिसांनी व उत्पादन शुल्क विभागाने त्या दुकानदाराकडून पैसे घेतल्याची चर्चा हणमंतवाडी येथे सुरु होती.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER