Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार

स्वतंत्र मजूर पक्षाची ८६वी वर्षपूर्ती

टीम : धैर्य टाईम्स

येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत आणि
त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ साली काढलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाला ८६ वर्षे पूर्ण होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा कार्यकाल जर आपण पाहीला तर आपल्याला असं लक्षात येत की त्याचं कर्तृत्व हे खूप व्यापक होतं. उदाहरणाखातर सांगायचं झालं तर एका पायलीमध्ये जितके तांदळाचे दाणे बसतील त्या तांदळांच्या दाण्यांपैकी एक दाणा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ रोजी काढलेला स्वतंत्र मजूर पक्ष.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय योगदानाची चर्चा करताना ती दोन पातळ्यांवर करावी लागते. एका पातळीवर त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी केलेले राजकारण आणि दुसऱ्या पातळीवर सर्वच भारतीयांसाठी आणि अंतिमतः मनुष्यजातीच्या मुक्तीसाठी केलेले योगदान समजावून घ्यावे लागते. बाबासाहेबांचे महिला, इतर मागासवर्गीय, कामगार, शेतकरी आदींच्या मुक्तीचे राजकारण तुलनेने दुर्लक्षित राहते. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अस्पृश्यतेचा प्रश्न राजकीय पातळीवर नेला आणि त्यांच्यासाठी राजकीय हक्कांची मागणी केली. संविधानात ते मिळवूनही दिले. सामाजिक न्यायासाठी प्रतिनिधित्व मिळावे यासाठी शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि पंचायत राज्य ते संसद येथे राजकीय आरक्षण मिळवून दिले.
त्यामुळे अस्पृश्यांचा मुक्तिदाता हा त्यांचा पैलू अनेकदा प्रखरपणे मांडला जातो, ठळकपणे पुढे येतो.
१९२४ ते १९३५ च्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चळवळ
चालविली ती बहिष्कृत हितकारिणी सभेच्या मार्फत. १९३० ते १९३५ च्या काळात काँग्रेस, हिंदु महासभा वगैरे मातब्बर राजकीय पक्षांनी साऱ्या भारताच्या पुढारीपणाचे नेतृत्व आपल्याकडे घेण्यासाठी जो अश्वमेध सुरु केला त्यात या पक्षांच्या अश्वांचा लगाम बाबासाहेबांनी पकडून ते अश्व अस्पृश्यांच्या राजकीय क्षेत्रातून दूर उभे केले व अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व या पक्षांच्या अश्वमेधाच्या यज्ञात पडू दिले नाही. लंडन येथील गोलमेज परिषदेत आणि पुणे कराराच्या वेळी प्राणपणाने लढा देऊन बाबासाहेबांनी अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व व हक्क मिळवले. या राजकीय हक्कांचा उपयोग अस्पृश्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी करण्यासाठी बाबासाहेबांनी विस्तृत भूमिका तयार करण्याचे ठरविले. अस्पृश्यांसाठी राजकीय पक्ष स्थापावा व त्यातर्फे अस्पृश्यांना जे १९३५ च्या कायद्याने राजकीय हक्क दिलेले आहेत त्यांचा भरपूर फायदा घेऊन अस्पृश्यांत जादा राजकीय आकांक्षा उत्पन्न कराव्यात, असे विचार निवडणुका जसजशा जवळ आल्या तसतसे बाबासाहेबांच्या मनात घोळू लागले. या बाबतीत विचार विनिमय करत असताना त्यांना असे वाटू लागले की १९३५ च्या कायद्यान्वये जे राजकीय हक्क
मिळालेत ते तर त्यांना मिळवता येतीलच, पण स्पृश्य लोकांकरिता जे राजकीय हक्क मिळालेत त्यांना मताचा पाठिंबा देऊन इतर उमेदवारही आपण निवडून देऊ शकू. हे विचार मनात येताच बाबासाहेबांनी राजकीय पक्ष जातीच्या पायावर न उभारण्याचे ठरविले. आतापर्यंत अस्पृश्यांचा लढा मर्यादित स्वरूपाचा होता. त्याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून बाबासाहेबांनी कामगार, शेतकरी यांच्या लढ्यांशी अस्पृश्यांचा लढा सलग्न करण्याचे ठरविले. पक्षाची घटना आणि त्याचे ध्येय व कार्यक्रम इंग्लंडमधील ब्रिटीश लेबर पार्टीचा आदर्श पुढे ठेऊन ठरविण्यात आले. गोलमेज परिषदेच्या निमित्ताने बाबासाहेबांना लंडनला पाच वेळा जावे लागले व तेथे प्रत्येक वेळेला काही महिने राहावे लागले. तेव्हा त्यांना मजूर पक्षाचे पुढारी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी परिचय रून घेण्याची व चर्चा करण्याची संधी मिळालेली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी ब्रिटीश मजूर पक्षाची घटना,
कार्यक्रम वगैरे संबंधीचे अभिलेख अभ्यासलेले होते. त्यातूनच त्यांनी आपल्या पक्षाची घटना, कार्यक्रम व ध्येय ही ठरविली आणि बाबासाहेबांनी नवीन पक्षाचे ‘Independent Labour Party’ स्वतंत्र मजूर पक्ष असे नामाभिमान केले.
पक्षाचा जाहीरनामा व कार्यक्रम तयार करण्यासाठी बाबासाहेब बैठक मारून बसले व तो त्यांनी तीन-चार दिवसात तयार केला. पक्षाची घटना व ध्येय ठरविताना त्यांनी इंग्लंडच्या लेबर पार्टीला नजरेसमोर ठेवलेले होते. इंग्लंडची लेबर पार्टी मंगळवार २७ फेब्रुवारी १९०० रोजी मेमोरियल हॉल, फॉरीग्ड्न स्ट्रीट, लंडन येथील ५,६८,००० कामगारांच्या ६५ ट्रेड युनियन्सच्या १२९ प्रतिनिधींच्या सभेत निर्माण करण्यात आली होती. बाबासाहेबांनी, स्वतंत्र मजूर पक्ष या नव्या पक्षाची घटना, ध्येय व कार्यक्रम याबद्दलचा वृत्तांत टाईम्स ऑफ इंडियाच्या १५ ऑगस्ट १९३६ (शनिवार) या अंकात प्रसिद्ध केला. तो पुस्तकाच्या रूपाने १९३७ साली श्री लक्ष्मीनारायण प्रेस, मुंबई येथे छापून प्रसिद्ध केला गेला.
अस्पृश्यवर्गाला हजारो वर्षे विशेषाधिकार प्राप्त झालेल्या वरिष्ठ वर्गांनी दाबून टाकले होते. सन १९३७ च्या पहिल्या निवडणुकीत मुंबई या इलाख्यात या पक्षाने निवडणूक लढविली. काँग्रेस समोर एकमेव विरोधी पक्ष म्हणून हा पक्ष पुढे आला. मुंबई प्रांतात स्वतंत्र मजूर पक्षातर्फे १८ उमेदवार बाबासाहेबांनी उभे केले होते. या उभे केलेल्या उमेदवारांना निवडून द्या, अशी विनंतीपत्रे बाबासाहेबांनी २३ जानेवारी १९३७ (पा.८) व ३० जानेवारी १९३७ (पा.१) च्या ‘जनता’ पत्रात प्रसिद्ध केली होती. या १८ उमेदवारांपैकी १३ उमेदवार हे राखीव जागेवर तर २ उमेदवार हे खुल्या जागेवरून विजयी झाले होते. विजयी उमेदवारांची नावे अशी होती- मुंबई मधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुणे पश्चिम- आर.आर. भोळे, सातारा उत्तर- खंडेराव सावंत, पुणे पूर्व- विनायकराव गडकरी, ठाणे दक्षिण- रामकृष्ण भातनकर, रत्नागिरी उत्तर- अनंतराव चित्रे, गंगाराम घाटगे, रत्नागिरी दक्षिण- शामराव परुळेकर, अहमदनगर दक्षिण- प्रभाकर रोहम, सोलापूर उत्तर- जिवाप्पा ऐदाळे, खानदेश पूर्व- दौलतराव जाधव, नाशिक पश्चिम- भाऊराव गायकवाड, बेळगाव उत्तर- बळवंत वराळे, ठाणे जिल्हा उत्तर- दत्तात्रय राऊत आणि
वऱ्हाडातून पंजाबराव देशमुख निवडून आले.
स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने कायदे मंडळाच्या निवडणुकीत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन
करण्यासाठी पक्षाच्या वतीने रविवार ता. ३० मे १९३७ रोजी संध्याकाळी परळ येथील कामगार मैदान पोयबावडी येथे डॉ. सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा भरविण्यात आली होती, त्या सभेत भाषण करताना बाबासाहेब म्हणाले की, “आज राजकारणाचा डाव बंद पडला असला तरी ज्या दिवशी हा डाव नव्याने सुरु होईल, त्यावेळेस जरूर असणारी तयारी आमच्याजवळ मजबूत आहे. आम्हांला जे कायदे घडवून आणायचे आहेत त्यांचे बार आमच्याजवळ भरून तयार आहेत. टार्गेट लावण्याची खोटी की, आम्ही एकदम आमचे पिस्तुल झाडणार आहोत------ कायदेमंडळापुढे मांडावयाच्या कायद्याचे मसुदे आमच्या खिशात तयार आहेत. आम्ही फक्त खेळ सुरु होण्याचीच वाट पाहत आहोत.”
मुंबई असेंबलीमध्ये स्वतंत्र मजूर पक्ष सशक्तपणे विधी सभेचे काम करीत होता. खोती पद्धती नष्ट करणारे बिल, कुटुंब नियोजन बिल यासारखी बिले पक्षाकडून मांडली गेली. शेतकऱ्यांचा खोती करणाऱ्यांचा भव्य मोर्चा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली १० जानेवारी १९३८ साली मुंबई मध्ये काढण्यात आला. १९३० पासून सुरु असलेल्या कष्टकऱ्यांच्या आंदोलनास स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कष्टकऱ्यांना खोतांच्या अत्याचाराविरोधात भूमिका घेऊन शेतकऱ्यांना संरक्षण दिले. चिपळूण, पथरे, चरी, नागोठणे, रेपाली, भेंडखाळ, काळवण, माणगाव, चिखलप इत्यादी ठिकाणी शेतकऱ्यांच्या परिषदा झाल्या. सोमवार ता. १६ मे १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिपळूण मुक्कामी अत्यंत स्फूर्तीदायक भाषण झाले. बाबासाहेबांच्या भाषणापूर्वी श्रीमती रत्नाबाई यांचे भाषण झाले. त्या म्हणाल्या, आमच्यावर खोतांचा भयंकर जुलूम होत असून, आता तो असह्य झाला आहे. तुम्ही आता येथे सभा घेऊन खेड, दापोली येथे जाल व तेथून मुंबईस परत फिराल. आम्ही मात्र येथे कायमचेच राहणार आहोत. तुम्ही गेल्यावर आमचा छळ कायम राहील. या भाषणानंतर काँग्रेस पक्षीयांकडून कुत्सित अर्थाने टाळ्या वाजविल्या गेल्या. उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले, “ आताच रत्नाबाईंच्या भाषणानंतर काही गृहस्थांनी टवाळी करण्याच्या उद्देशाने टाळ्या वाजविल्या. त्यांच्या टाळ्यांचा अर्थ मी समजतो-----काही खोत कुळास म्हणतात की, ‘तुझा आंबेडकर काय करतो ते पाहून घेईन’ हे खोत त्यांची व माझी लायकी सारखे समजतात काय? कोणताही खोत माझ्यापुढे आल्यास बुद्धीने मी सहजासहजी त्याचा पाडाव करीन. ते माझी व त्यांची तुलना करीत असल्यास मी म्हणेन की कोठे मी हिमालय पर्वत व कोठे हा मुतखडा! मी श्रीमंत नसलो तरी माझे दृष्टीने तुमचे हितास आवश्यक वाटते ते मी करीत आलो आहे आणि करीत राहणार. आज कोठेही जा जज्ज, मामलेदार, मुनसफ, कलेक्टर हे सर्व पांढरपेशा वर्गाचे आहेत. आज तुमची संख्या शेकडा ८० पेक्षा जास्त असताना सरकारी नोकरीत तुमचे इतके थोडे लोक असावेत हे कशाचे निदर्शक आहे? मला तुमच्यापैकी प्राईम मिनिस्टर झालेला पहावयाचे आहे. मला या मुठभर भटजी शेठ्जीचे राज्य नको असून तुम्हा ८०% लोकांचे राज्य हवे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे हीच खोती पद्धत म्हणजेच एक प्रकारची वेठबिगारी भारताच्या
संविधानामध्ये ‘कलम २३’ अन्वये कायदा करून नष्ट केली. बाबासाहेबांनी इतक सगळं करून देखील आज आंबेडकरवादी जनसमूह लक्षावधींच्या संख्येने त्यांच्या अभिवादनाला पुढे येतो, मात्र मध्यमवर्गीय, पांढरपेशे, बुद्धीजीवी आणि इतर मागास जातींचे लोक बाबासाहेबांच नाव जरी ऐकलं तर नाक मुरडतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे भारतात लोकशाही समाजवादी जीवनमूल्ये प्रस्थापित करण्याकरिता व समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकरिता सामाजिक व आर्थिक दृष्ट्या पिळल्या गेलेल्या अशा सर्व कष्टकरी, भूमिहीन, शेतमजूर-कामगारांच्या, एकंदर सर्वहारा जनतेच्या एकजुटीचा प्रयत्न होय. सामंती, सरंजामी, जातीय, ब्राह्मणी आणि भांडवली अशा एकंदर विषमतेच्या विरोधात संघर्षाचे व नकाराचे धोरण स्वीकारलेल्या, भारतातील श्रमिकांचा एकमेव पक्ष व राजकीय संघटन म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष होय.

प्रथमेश हणमंत हबळे

छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा [स्वायत्त ]

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER