सर्दी, खोकला, ताप हा साथीच्या आजाराचा प्रसार H3N2 या व्हायरसमुळे सगळ्यांमध्ये होत आहे. हा नेहमीप्रमाणेच होणारा एक फ्लू चा प्रकार आहे. आणि त्याचा जीवाला काहीही धोका नाही. शरीराला त्या आजाराविरुद्ध लढायला आणि त्यामधून मार्ग काढायला स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवायला वेळ दिला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये कोणताही आजार पूर्णपणे बरा करण्याची उपजतच शक्ती असते : डॉ. सिद्धार्थ लावंड
सध्या सुरू असलेल्या सर्दी, खोकला,ताप आणि दीर्घकाळ राहणारा खोकला यामुळे लोक हैराण आहेत, हा साथीच्या आजाराचा प्रसार H3N2 या व्हायरसमुळे सगळ्यांमध्ये होत आहे. हा नेहमीप्रमाणेच होणारा एक फ्लू चा प्रकार आहे, आणि त्याचा जीवाला काहीही धोका नाही आणि तो बरा व्हायला चार ते पाच दिवस लागणार याबद्दल काही शंका नाही. परंतु या आजारामध्ये राहणारा खोकला हा दीर्घकाळ टिकणारा खोकला आहे असे पेशंट कडून समजते आहे.
प्रथमतः आजार झाल्यानंतर किंवा कोणताही आजार झाल्यानंतर शरीराला त्या आजाराविरुद्ध लढायला आणि त्यामधून मार्ग काढायला स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवायला वेळ दिला पाहिजे, आपल्या शरीरामध्ये कोणताही आजार पूर्णपणे बरा करण्याची उपजतच शक्ती असते परंतु आपण त्या शक्तीचा कधी वापरच होऊ देत नाही.सर्दी, खोकला झाला की ताबडतोब औषधे अँटिबायोटिक चालू करणे किंवा परस्पर मेडिकल मधून जाऊन औषधे घेणे ( सर्वात धोकादायक), पहिल्या डोसने बरे नाही वाटले की लगेच डॉक्टर बदलणे व नवीन अँटिबायोटिक चालू करणे, त्या अँटिबायोटिक ने देखील फरक नाही पडला तर शेवटी स्टिरॉइड्स, कफ सप्रेसेंट किंवा एक्स्पेक्टरंट वापरणे असा मोठा प्रवास सुरू होतो.
पेशंटला घाई असते ताबडतोब बरे होण्याची आणि उद्याच्या उद्या कामावर हजर होण्याची आणि डॉक्टरला घाई आजारापेक्षा मोठे औषध देऊन तो आजार लवकरात लवकर बरे करण्याची, परंतु यामध्ये जे नुकसान होते ते शरीराला सहन करावे लागते.
आजाराच्या ताकतीपेक्षा त्यासाठी वापरली जाणारी औषधे किंवा वापरली जाणारी अँटिबायोटिक ही खूप जास्त ताकतीची असल्यामुळे शरीराला स्वतःला रोगप्रतिकारशक्ती तयार करायला वेळच मिळत नाही आणि आजार नैसर्गिकरित्या बरा होण्याऐवजी आजाराचा मार्ग बदलला जातो आणि आजाराची लक्षणे दिवसेंदिवस वाढतच जातात, यामध्ये काही लक्षणे आजाराची असतात आणि काही लक्षणे पेशंट ने घेतलेल्या अँटिबायोटिक्स ( औषधांचे साईड इफेक्ट्स) मुळे देखील असतात.
सर्व पेशंट्स ना विनंती आहे की सर्दी खोकला, ताप, थंडी अंगदुखी, म्हणजे फ्लू सदृश्य लक्षणे दिसल्यानंतर कृपया स्वतःच्या शरीरावर औषधांचा मारा करून घेऊ नये, आजार नैसर्गिकरित्या बरा होईल याची वाट बघा आणि आजार नैसर्गिक रित्या बरा होण्याकरिता त्याला मदत करणारी होमिओपॅथिक आयुर्वेदिक औषधे जी निसर्ग शास्त्रावर अवलंबून आहेत अशा औषधांचा वापर करा, साईड इफेक्ट टाळा, स्वतःच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत करा, आजाराला संपण्यासाठी त्याचा नैसर्गिक मार्ग मोकळा करा, आणि मग बघा की आजार कमीत कमी वेळात बरा होतो की आजाराची लक्षणे दिवसेंदिवस वाढत जातात !
डॉ सिद्धार्थ लावंड,
होमिओपॅथी तज्ञ, फलटण