राज्यातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभागांर्तगत “पंडीत दिनदयाल उपध्याय स्वयंम योजना “ सुरू करण्यात आली आहे. या योजनेकरिता इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी आहे मागील इयत्तेत ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र असुन प्रतिवर्ष ४३ हजार लाभाचे वितरण केले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत. असे आवाहन , संतोष जाधव , सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा यांनी केले आहे.











