Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर

शिक्षण क्षेत्रातील तारा - सुभाषराव सूर्यवंशी (बेडके)

टीम : धैर्य टाईम्स

समाजाच्या सर्व क्षेत्रात विशेष करून शिक्षण क्षेत्रात सातत्याने अलौकिक कार्य केलेल्या सुभाषकाकांना आपल्यातून जाऊन आज एक वर्षे झाले आहे. लौकिक अर्थाने ते आपल्यातून गेले असले तरी त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे ते अनंत काळापर्यंत आपल्या सोबत राहणार आहेत. काकांच्या पश्चात त्यांच्या सुविद्य पत्नी सविता काकींनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारुन एक प्रकारे काकांना व त्यांनी केलेल्या असामान्य कार्याला भावपूर्ण श्रध्दांजलीच वाहिली आहे.

आज काकांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या बद्दलच्या अनंत आठवणींनी मनात गदीं केली आहे. गेली चार पाच दशके त्यांच्या सहवासात राहिल्याने त्यांच्या अंतर्यामाशी व कार्यपध्दतीशी मी थोडा फार परिचीत झालो आहे. आज त्यांच्या स्मृतिला मनःपूर्वक अभिवादन करुन त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा जनमानसाला परिचय करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे.

पन्नास - साठ वर्षापूर्वी फलटण तालुक्यात शिक्षणाचा विस्तार म्हणावा तसा झाला नव्हता. बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणापासून वंचित असलेल्या या घटकाला शैक्षणिक दृष्ट्या सक्षम आणि साक्षर करण्याच्या ध्येयाने के. कर्मवीर भाऊराव पाटील आण्णांच्या प्रेरणेने आणि कै. यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने सुभाषकाकांच्या वडिलांनी कै. नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) तथा नानांनी त्या खडतर काळात आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने श्रीराम एज्युकेशन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्याकाळी बहुजन समाजासाठी शाळा काढणे म्हणजे एक धाडसच होते.

कै. नानांनी काढलेल्या शाळांचा विस्तार करणे, इमारती, क्रिडांगणे उभी करणे या गोष्टी महाकठीण होत्या. अशा या बिकट परिस्थितीत विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्याचे ठरविले आणि अगदी कालपर्यंत त्यांनी या ध्येयाचा पाठपुरावा करुन ते तडीस नेहले आहे.

त्यांच्या या अफाट कार्यामुळे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा एक अविभाज्य भाग म्हणजे सुभाषकाका असे समीकरण झाले आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली त्यावेळी समाजातील तळा गळात त्यासाठी फारशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. अशा या दुर्लक्षीत समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून त्यांनी आपल्या संस्थेच्या सर्व शाखांचा सर्वार्थाने विस्तार केला. कोणाचे ही आर्थिक पाठबळ नसताना पण सामान्यांच्या जनाधारावर त्यांनी हे कार्य यशस्वीरित्या पार पाडले.

कै. नानांनी उभारलेल्या या संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक याढ त्यांनी केली. शिक्षणाने समाजात परिवर्तन होते, माणूस विचारशील बनतो, त्यामुळे शिक्षणाला पर्याय नाही या विचारावर ते ठाम होते. शिक्षणासह मूल्यविचारांबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यामुळे संस्थेच्या सर्व शाखा आजही बदलत्या काळाबरोबर नेहमीच प्रगतशील आणि ज्ञानाबद्दल अद्ययावत राहिल्या आहेत. शाळांच्या इमारती, विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गरजा, नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यासाठी कोणाचेही आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांनी स्वतःची वैयक्तिक मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली होती, त्यागाची परिसिमा या पेक्षा आणखी काय असू शकते.

सातारा जिल्ह्याच्या नकाशावर शिक्षण क्षेत्रात श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते याचे श्रेय निर्विवाद काकांकडे जाते. शिक्षण क्षेत्रात शिक्षक व विद्यार्थी हे दोन घटक अत्यंत महत्वाचे असल्याने विद्यार्थ्यांबद्दल त्यांना अत्यंतिक जिव्हाळा व अभिमान होता तर शिक्षकांबद्दल आपुलकी प्रेम व अपेक्षाही होत्या. शिक्षकांना त्यांनी ध्येयवादाचा मार्ग दाखवला आणि हाच ध्येयवाद शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. दुसऱ्यांना सतत प्रोत्साहन देणे, त्यांना उद्यमशील बनविणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्टे होते.

विद्यार्थी हा देशाचा एक चांगला सुसंस्कारित नागरिक झाला पाहिजे हा विचार त्यांनी आपल्या संस्थेच्या सर्व शिक्षक वर्गात, सेवकांत रुजविला आहे. शिक्षण क्षेत्रातील एक मानदंड, आधुनिक विचारांचा पुरस्कर्ता, नवीन शैक्षणिक धोरणाचा पाठीराखा, एक सच्चा समाजसेवक म्हणून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. संस्थेतील त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल त्यांच्या मनी आदराची भावना आहे. प्रत्येक विषयाच्या खोलवर जाऊन त्या विषयाचा मागोवा घेण्याच्या त्यांच्या चौकस स्वभावामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रात त्यांचा मित्रवर्ग विखुरलेला आहे.

स्वतःच्या कुटूंबावद्दल ते अत्यंत भावूक आहेत कै. नानांनी लावलेल्या शिक्षणरुपी रोपटयाचे, अनंत अडचणीवर मात करीत त्यांनी विशाल वृक्षात रुपांतर केले आहे. तर त्यांच्या दोन्ही मुलांनी या विशाल वृक्षाचे वटवृक्षात रुपांतर केले आहे. थोरले चिरंजीव श्री.डॉ. सचिन यांनी आपले आजोबा कै. नाना व वडील कै. सुभाषकाका यांच्या प्रमाणे स्वतःचे जीवन शिक्षणासाठी वाहून घेतले आहे, या त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई यांचाही हातभार आहे. धाकटे चिरंजीव श्री. महेंद्र यांनी शिक्षणाबरोबर राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेची पताका हाती घेतली आहे.

श्री. सचिन यांच्या कार्याचा आवाका पाहून एका मान्यवर संस्थेने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पी. एचडी ही पदवी प्रदान केली आहे. तर चालू वीं संस्थेच्या कार्याचा विस्तार आणि प्रगती पाहून महाराष्ट्र शासनाने संस्थेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन संस्थेच्या कार्याचा गौरव केला आहे. तर महेंद्र यांना विभागीय च राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस पक्षात जबाबदारीची पदे मिळाली आहेत. काँग्रेस पक्षाचे एक रचनात्मक कार्य करणारे, उत्कृष्ट संघटक, क्रियाशील खंदे नेते म्हणून ते पक्षात प्रसिध्द शाळांनी आयुष्यभर जे शशैक्षणिक कार्य केले त्यात त्यांच्या पत्नी सविता काकी सर्व काळ त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काकांना जे उत्तुंग यश मिळाले, वेळोवेळी जो मानसन्मान मिळाला त्या यशात काकींचा सिंहाचा वाटा आहे.

सर्व नातंर्वधनात नाजूक आणि हळवे नाते म्हणजे नातवंडे आणि काकाही आपल्या दोन्ही लाडक्या नातवंडा बाल हळवे होते. अशा या दूरदशी व बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या काकांचे शैक्षणिक कार्य आपणा सर्वासाठी प्रेरणादायी आहे. आज त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याचा पाठपुरावा करणे हीच त्यांना खरी आदरांजली होईल. त्यांच्या स्मृतिला विनम्र अभिवादन.


 सतीश मोरेश्वर पटवर्धन, 
 सेवानिवृत्त मुख्याध्यापक, यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER