Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात

जिल्हा प्रशासनाला विजय दिवसाचा विसर

ऍड. विनित पाटील : वर्धापन दिन साजरा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
टीम : धैर्य टाईम्स
District administration forgets Victory Day
देशभरात 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971 साली पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धाला 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. असे असताना संपूर्ण देशभरात सुमारे 15 दिवसांपासूनच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून विजय दिवस साजरा करुन वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार देवून गौरविण्यात येत आहे. मात्र सातारा प्रशासनाकडून असे घडताना दिसत नसल्यामुळे 16 डिसेंबर पूर्वी सैनिकांचा सन्मान न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी सैनिक ऍड. विनित पाटील यांनी दिला आहे.

सातारा : संपूर्ण देशभरात 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971 साली पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धाला 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. असे असताना संपूर्ण देशभरात सुमारे 15 दिवसांपासूनच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून विजय दिवस साजरा करुन वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार देवून गौरविण्यात येत आहे. मात्र सातारा प्रशासनाकडून असे घडताना दिसत नसल्यामुळे 16 डिसेंबर पूर्वी सैनिकांचा सन्मान न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी सैनिक ऍड. विनित पाटील यांनी दिला आहे.
3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 1971 दरम्यान इंडो-पाकिस्तान युद्ध झाले होते. या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी प्राणांची बाजी लावून अवघ्या 13 दिवसांतच पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकायला लावून बांग्लादेश या नव्या राष्ट्राचा जन्म झाला. परंतू या युद्धामध्ये भारताचे सुमारे 3 हजारांपेक्षा जास्त जवान शहीद झाले होते, तर 12 हजार सैनिक जखमी झाले होते. 16 डिसेंबर रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. त्याप्रित्यर्थ देशभरात 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा प्रशासनाच्यावतीने गौरव व सन्मान करण्यात येतो. 16 डिसेंबर 2021 रोजी इंडो-पाक युद्धाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानुसार या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मान करणे संयुक्तिक असतानाही जिल्हा प्रशासनाचे तसे केले नाही. याबाबत 22 नोव्हेंबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना भेटून तोंडी विनंती करुनही प्रशासनाच्यावतीने यासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. एकूणच जिल्हा प्रशासनाकडून माजी सैनिकांबाबत सहानुभूती दिसून येत नसल्याचा आरोपही ऍड. विनित पाटील यांनी केलेला आहे.
इंडो-पाक युद्धाबरोबरच इतर युद्धामध्ये ज्या सैनिकांना वीरगती प्राप्त झाली, अशा सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार देवून गौरविण्यात येते. परंतू सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असूनही आज सातारा जिल्ह्यामध्ये वीरगती प्राप्त झालेले तसेच माजी सैनिकांचाही सन्मान होत नाही, हे सातार्‍यासारख्या सैनिकी परंपरा लाभलेल्या जिल्ह्याला भूषणावह गोष्ट नाही. या सैनिकांचा 16 डिसेंबर पूर्वी यथोचित सन्मान न झाल्यास 16 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रध्वज स्तंभाच्या खाली एकदिवसीय आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही माजी सैनिक ऍड. विनित पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER