Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

जैनांची दक्षिण काशी फलटण येथे दि. २५ व २६ डिसेंबर रोजी २७ व्या मराठी जैन साहित्य संमेलनाचे आयोजन

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : 

महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्यावतीने २ दिवसीय २७ वे मराठी जैन साहित्य संमेलन श्रीचंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर शेजारी, नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे गुरुवार दि. २५ व शुक्रवार दि. २६ डिसेंबर असे दिवस आयोजित करण्यात येत आहे. फलटण शहराला लाभलेल्या ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक परंपरांच्या पार्श्वभूमीवर येथे होत असलेले मराठी जैन साहित्य संमेलन इथल्या परंपरांमध्ये वाढ करणारे ठरेल असा विश्वास प्रा. डी. ए. पाटील यांनी व्यक्त केला आहे. 


फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या या २७ मराठी जैन साहित्य संमेलना विषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. डी. ए. पाटील बोलत होते. यावेळी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विजयदादा आवटी, संजय देवगोंडा पाटील व सुरेश रोटे, स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत शांतीलाल दोशी, नितीन गांधी, प्रकाशभई दोशी (वाकडमाने), दिपकभई दोशी उपस्थित होते.


जैन धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून सर्वार्थाने समृद्ध असणाऱ्या फलटण धर्मनगरीत जैन साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी, बाल साहित्यिक, स्वाध्याय प्रेमी, लेखक - वाचक, महिला - पुरुष, युवक - युवती यांच्या सहयोगाने साहित्यिक, रसिक, वाचक, श्रोत्यांची मांदियाळी संमेलन स्थळी असेल असा विश्वास व्यक्त करीत फलटण येथे हे मराठी चैन साहित्य संमेलन दुसऱ्यांदा होत असल्याचे प्रा. डी. ए. पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.


गुरुवार दि. २५ डिसेंबरच्या पहिल्या सत्रामध्ये या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रख्यात कथाकार, विचारवंत व साहित्यिक विजय आवटी सर भूषविणार आहेत. मराठी जैन साहित्य संमेलनाचे उद्घाटन जैन धर्माचे अभ्यासक, इतिहासकार, शिव संभाजी चरित्राचे व्याख्याते व पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत शांतीलाल दोशी फलटण हे सर्वांचे स्वागत करतील. या संमेलनास मंगल सानिध्य प. पू. १०८ आचार्य श्री पद्मनंदी महाराज सत्संग प. पू. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मीसेन महाराज कोल्हापूर, व प. पू. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महाराज नांदणी यांची उपस्थिती लाभणार आहे. 


दुसऱ्या सत्रामध्ये जैन साहित्य संस्कृती मध्ये फलटणचे योगदान या विषयावरील परिसंवाद प्रा. डॉ. सुधीर शास्त्री बारामती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत असून डॉ. महावीर शास्त्री व प्रा. डी. ए. पाटील हे परिसंवादात सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात भारतीय चित्रपट सृष्टीत जैनांचे योगदान या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षस्थान डॉ. पुरंदर चौगुले भूषविणार असून डॉ. रावसाहेब पाटील सोलापूर व अनमोल कोठाडिया कोल्हापूर हे या परिसंवादात सहभागी होणार आहेत. चौथ्या सत्रामध्ये जैन पत्रकारिता दशा व दिशा या विषयावरील परिसंवाद डॉ. गजकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रा. ए. ए. मासुर्ले, डॉ. नेमिनाथ शास्त्री या चर्चा सत्रात सहभागी होणार आहेत. पाचव्या सत्रात विजयकुमार बेळंके यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन संपन्न होणार आहे. 


दुसऱ्या सभागृहात बालकुमार साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. यामध्ये रंगभरण स्पर्धा, संवाद हरवतो आहे या विषयावर प्रख्यात लेखिका सौ. नीलम माणगावे यांचे मार्गदर्शन व त्याबरोबरच बालकवी संमेलन, बालकथा संमेलन संपन्न होणार आहे. 


शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी आजची जैन स्त्री या विषयावरील परिसंवाद प्रा. सौ. वृषाली मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत असून सौ. नेहा शहा, संगीता शहा व सौ. शुक्ला गांधी यांचा सहभाग असणार आहे.


सहाव्या सत्रामध्ये प्राचीन जैन साहित्य एक चर्चा - प्राचीन, अर्वाचीन, प्रागतिक विचार या विषयावरील परिसंवाद जैन इतिहासाचे अभ्यासक संजय देवगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत असून डॉ. महावीर शास्त्री व प्रा. रमेश मडकर हे जैन अभ्यासक चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. त्यानंतर कथाकथन संपन्न होईल. 


समारोप सत्रात महास्वामी लक्ष्मीसेन महाराज यांचे सानिध्य लाभेल. त्यामध्ये प्रमुख पाहुणे प्राचार्य चंद्रशेखर मुरुमकर, दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे 'युवक युवती मूल्यवर्धन' व 'उद्योग - व्यवसाय' या विषयावर विचार मांडतील. 


या साहित्य संमेलनाच्या संयोजनासाठी स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी, गौरवाध्यक्ष किशोरभई शहा, मंगल दोशी, नितीन गांधी, दीपक दोशी, आलोक दोशी, राजकुमार दोशी, विश्वस्त राजेश शहा, धनंजय शहा, अनिल शहा, विनय गांधी, बीना शहा, डॉ. रविंद्र दोशी, सुकुमार चंकेश्वरा उपस्थित राहणार आहेत. 


व्यासपीठ उद्घाटन किशोरभई शहा (चंदूकाका सराफ बारामती) यांच्या हस्ते होईल. जिनवाणी शास्त्र पूजन भूषण द़ोशी, ध्वजारोहण श्रीमती शैला गांधी, भव्य ग्रंथ दिंडी शुभारंभ श्रीमती जयश्री दोशी यांच्या हस्ते होईल. प्राचीन दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन श्रीमती प्रफुल्लता गांधी यांच्या हस्ते होईल. त्यावेळी राजकुमार व्होरा, चंद्रशेखर दोशी, वीरकुमार दोशी हे उपस्थित असतील. 


फलटण पंचक्रोशीसह पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील साहित्यिक लेखक कवी यांनी या संमेलनास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी यांनी केले आहे.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER