फलटण प्रतिनिधी:- एसटी स्टँड येथून एका ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३ रोजी ११:१५ वाजण्याच्या दरम्यान फलटण एसटी स्टँड येथून फिर्यादी अनिल एकनाथ गाडेकर (वय 68 वर्षे रा. B/6 गिरिजात्मक कॉम्प्लेक्स सायली हिल भिगवण रोड बारामती ता.बारामती जि. पुणे मुळ रा. मोरगाव ता. बारामती) यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी अनिल गाडेकर यांनी आज्ञात चोरट्या विरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पो. हवा. वीरकर करत आहेत.