आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी यात्रा कमिटीवर गुन्हा -
यात्रेनिमित आयोजित महाराष्ट्राची गौरव गाथा कार्यक्रम पोलिसांना रात्री दहा वाजता बंद केल्यानंतरही यात्रा कमिटीने पुन्हा तो सुरू करून आदेशाचा भंग केला. त्यामुळे या कार्यक्रमात दोन समाजात वाद होऊन तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून श्री भैरवनाथ-जोगेश्वरी यात्रा कमिटीच्या २८ जणांच्या विरोधात लोणंद पोलिसात पो-लीस नाईक सतीश दडस यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणंद : धैर्य टाईम्स
तरडगाव, ता. फलटण गावच्या हद्दीत सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथील मैदानात श्री भैरवनाथ जोगेश्वरी देवाच्या यात्रेनिमित महाराष्ट्राची गौरवगाथा कार्यक्रम सुरू असताना नाचण्याच्या कारणावरून दोन समाजातील गटात झालेल्या मारामारीमध्ये अनेकजण जखमी झाले. या मारामारी प्रकरणी लोणंद पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही बाजूच्या सुमारे २३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूकडील २२ जणांना लोणंद पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत तरडगाव येथील संतोष गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की तरडगाव, ता. फलटणच्या भैरवनाथ जोगेश्वरी देवाच्या यात्रेनिमित्त गावातील महिलांकरता महाराष्ट्राची गौरवगाथा कार्यक्रम सुरु असताना प्रतीक उर्फ भैया कुमार गायकवाड, रा. तरडगाव, ता. फलटण हा दारू पिऊन नाचत होता म्हणून संतोष गायकवाड व यात्रा कमिटी सदस्य प्रदीप गायकवाड, दीपक गायकवाड, संतोष कुंभार यांनी नाचू नको, शांत बसून कार्यक्रम बघ असे सांगितले. त्यावेळी त्याने ऐकले नाही.
बाजूला नेल्याच्या कारणावरून चिडून प्रतीक गायकवाड, सुमेध संदीप गायकवाड, बादल दिनेश गायकवाड सुहास जनार्दन गायकवाड, अजय आनंदा ननावरे, अमित आनंदा ननावरे, आयुष बनसोडे व इतर १५ ते २० जणांनी संतोष गायकवाड यांना पाठीमागून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या डोक्यात दगड मारला. दगड लागून जखम होऊन रक्त आले म्हणून वरील ७व इतर १५ ते २० जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. करुणा दिनेश गायकवाड, रा. तरडगाव यांच्या फिर्यातीत म्हटले आहे की, भैरवनाथ देवाची यात्रा असल्यामुळे ठेवण्यात आलेला ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यांचा मुलगा बादल गायकवाड हा उभा राहून नाचू लागला म्हणून ऑर्केस्ट्रा पाहण्याकरिता आलेल्या मराठा समाजाच्या १६ जणांनी त्यांच्या मुलाला मारहाण केली. फिर्यादी भांडणे मिटवण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील दोन चापटी मारण्यात आल्या व त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून कोठेतरी गहाळ झाले. त्यांच्या जातीतील इतर बायका सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली व तुमच्या जातीतील बायकांना इथे बसू द्यायचे नाही असे म्हणाले. जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली म्हणून ओंकार सोपान गायकवाड, आदित्य शंकर गायकवाड, अक्षय दत्तात्रय गायकवाड, संतोष वसंत गायकवाड, गायकवाड, गायकवाड, प्रदीप शिवाजी मयूर शिवाजी यश संतोष गायकवाड, अक्षय हिवरकर, राहुल विजय गायकवाड, सुदाम रामदास गायकवाड, तुकाराम नवनाथ गायकवाड, गायकवाड, गायकवाड, सौरभ महेंद्र धीरज शरद महेश नवनाथ गायकवाड, रणजित यशवंत गायकवाड, सागर वसंत गायकवाड व इतर ८ ते १० जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणंद पोलिसांनी या मारामारी प्रकरणी एका गटातील १५ जणांना व दुसऱ्या गटातील सात जणांना अटक केली आहे. पीएसआय विशाल कदम तपास करत आहेत.