फलटण प्रतिनिधी:-मौजे सुरवडी ता .फलटण गावाच्या हद्दीतील इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर मधील एकूण ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने काढून चोरून नेहल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० रोजीचे रात्री ११:३० वाजण्याच्या दरम्यान मौजे सुरवडी ता .फलटण गावाच्या हद्दीतील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर याची १०० केव्ही ए क्षमता असलेला इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर खाली पाडून ट्रान्सफर मधील २०० लिटर ऑइल सांडून नुकसान केले व १०० किलो वजनाची कॉपर वायर एकूण ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने काढून चोरून नेहलेली आहे अशी फिर्याद सचिन पांडुरंग पवार (वायरमन म. रा. वि. वि.कंपनी शाखा कार्यालय रा. महतपुरा पेठ मलटण ता फलटण) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली आहे याचा अधिक तपासी पो हवा पिसे करत आहेत.