Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत

अथांग वेब सिरिजच्या चित्रीकरणास लागेल ते सहकार्य राहील

खा. उदयनराजे भोसले : बॉलीवूड आणि सॉलीवूड मधील निर्माता-दिग्दर्शकांनी सातारा जिल्ह्यात चित्रीकरण करावे
टीम : धैर्य टाईम्स
The filming of the Athaang web series will continue to be supportive
पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांच्या प्रामाणिक मेहेनतीवर चित्रकथा जनमानसावर गारुड करते. याच धर्तीवर असणारी अथांग ही वेब सिरिज निश्चितच सुपर डुपर ठरेल, याचे सातारा जिल्ह्यातील चित्रीकरणास लागेल ते सहकार्य आमचे राहील, असे उद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

सातारा : समाजातील वास्तवाचे प्रतिबिंब चित्रपट आणि दूरदर्शन, वेब सिरिअल्स मधुन होत असते. वास्तवतेबरोबरच पटकथेला साजेसे काही मनोरंजनात्मक समयोचित प्रसंग चित्तारले जावून, एक पूर्ण कथा पडदयावर झळकत असते. पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांच्या प्रामाणिक मेहेनतीवर चित्रकथा जनमानसावर गारुड करते. याच धर्तीवर असणारी अथांग ही वेब सिरिज निश्चितच सुपर डुपर ठरेल, याचे सातारा जिल्ह्यातील चित्रीकरणास लागेल ते सहकार्य आमचे राहील, असे उद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
क्रिएटिव्ह विवे निर्मित, प्रसिध्द दिग्दर्शक जयवंत पवार, दिग्दर्शीका तेजस्विनी पंडीत, संतोष खेर यांची प्रमुख भूमिका असलेल्या अथांग या वेब सिरीजच्या कोरेगांव तालुक्यातील साप या गांवातील चित्रीकरणाचा शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी क्लॅप देवून केला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, सातारा जिल्हा निसर्गाने वरदान दिलेला जिल्हा आहे. महाराष्ट्रात असा बहुदा एकमेव जिल्हा आहे. शुध्द वातावरण, नद्यांचे संगम, डोंगरमाथा, घाटरस्ता, कोरडे रान, अशी निसर्गाची सर्व रंगरूपे एकाच जिल्ह्यात पहायला मिळतात. निसर्गांनी उधळण केलेल्या या जिल्ह्यातील नागरिक देखिल परोपकारी आणि सहिष्णू आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात रोजगार वाढीसाठी सिने चित्रपट आणि सिरिअल्सचे चित्रीकरण अधिकाधिक व्हावे याकरीता प्रोत्साहन आणि पाठींबा देण्याचा निर्णय सातारकरांनी घेतलेला आहे.
येथुन पुढील काळात बहुतांशी चित्रपटांचे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील ठिकठिकाणी होण्यासाठी लागणारी परवानगी सिंगल विंडो मधुन प्रदान करणे, चित्रीकरणासाठी मुलभुत सुविधा पुरवणे, निर्माते आणि प्रशासन, नागरीक यांच्यामध्ये समन्वयाकरीता, समन्वयक तयार करणे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, येत आहेत. अथांग वेब सिरीज या उपक्रमाची नांदी म्हणावी लागेल.
चित्रीकरणामुळे जवळजवळ सर्वच क्षेत्रात आर्थिक उलाढाल वाढत असते, उलाढाल वाढल्याने क्रियाशक्ती वाढते आणि एकंदरीत जीवनमान उंचावण्यास हातभार लागत असतो. यासाठीच निर्माते आणि सातारकर जिल्हावासिय यांचे सार्वत्रिक हिताकरीता इनोव्हेटीव्ह साताराच्या माध्यमातून योग्य दिशेने विविध प्रयत्न सुरु आहेत.
चित्रीकरण करायचे आहे, सातारला या, आपले स्वागत आहे. जी समस्या उद्भवेल ती आमच्यावर सोपवा. सातारकरांच्या हिताच्या प्रत्येक बाबीकरीता आम्ही जातीने अश्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. सातारच्या निसर्गाचा आणि नैसर्गिक रचनेचा लाभ घेत ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक, सैनिक परंपरच्या पवित्र भुमीमध्ये बॉलीवूड आणि सॉलीवूड मधील निर्माता-दिग्दर्शकांनी सातारा जिल्ह्यात चित्रीकरण करावे, असे आवाहनही या प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
अथांग या नावातच अवखळता, धीरगंभीरता आहे. सामावून घेण्याची मानसिकता दडलेली आहे. त्यामुळे ही वेब सिरीज निश्चितच जनमानसावर गारुड करेल अश्या सदिच्छा आमच्यासह सर्व सातारकरांच्या आहेत, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
प्रारंभी, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे चित्रीकरण सेटवर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि प्रतिमा देवून सर्वांच्या वतीने स्वागत केले. यावेळी रेणु येळगांवकर, पंकज चव्हाण, रोहीत सावंत, चित्रीकरणाचे व्यवस्थापक, सहकलाकार, बालकलाकार, सेटकर्मी, कलाप्रेमी, सापचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER