फलटण प्रतिनिधी:-
फलटण येथील अपघातात मृत्यू झालेल्या गणेश लोंढे व अमीर शेख यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आर. के. सी इन्फ्रा स्ट्रक्चर च्या रात्रीच्या वेळी अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या तीन गाड्या पकडुन पोलिस प्रशासनाच्या ताब्यात देण्यास फलटण तालुक्यातील तरुण वर्गाने सुरवात केली आहे. कायद्याची पायमल्ली करत सदरची कंपनी काम करत असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.
आळंदी - पंढरपूर पालखी महामार्गाचे काम करणाऱ्या आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या नियमबाह्य व धोकेदायक कामामुळे अमीर शेख व गणेश लोंढे तरुणांना जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी आर.के.सी कंपनी यांच्या विरोधात दिनांक १८ रोजी फलटणकरांनी मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी अपघातात मृत झालेल्या गणेश लोंढे व अमीर शेख कुटुंबियांना प्रत्येकी ५०-५० लाख आर्थिक मदत मिळणेबाबत तसेच आर. के. सी.इन्फ्रा स्ट्रक्चर कारवाई करणेबाबत फलटण तालुक्याील तरुण वर्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी दोघांचा बळी घेणा-या कंपनीवर गुन्हा दाखल करावा व काळया यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. जोपर्यंत आर. के. सी. कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही तसेच त्यांच्या वारसांना निधी मिळत नाही, तोपर्यंत आर. के. सी. कंपनीचे काम बंद पाडण्यात येईल व पुढे काम चालु दिले जाणार नाही असे निवदेणात देण्यात आले होते.
परंतु याबाबत दिनांक १९ रोजी सायंकाळ अखेर कोणताही आर्थिक रक्कम देणे बाबतचा तोडगा न निघाल्याने रात्री १ वाजण्याच्या सुमारास तरुणांनी एकत्र येत नाना पाटील चौक येथे आर. के. सी. कंपनीचे गौणखनिज वाहतूक करणारे तीन डंपर युवकांनी अडवुन पोलिस प्रशासनाच्या ताब्यात दिले. यावेळी या आर. के. सी. कंपनीचे काम नियमबाह्य चालू आहे संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत गोणखनिज वाहतुक करता येत नाही असे असताना पण बेकायदेशीरपणे आर. के. सी कंपनी संध्याकाळी ७ ते सकाळी ७ गोणखनिज वाहतुक करत आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहेत याला जबाबदार ही आर. के. सी. कंपनी आहे. मुरुम माती सुध्दा नियमबाह्य खोदकाम करुन शासनाचा महसुल बुडवला जात आहे. पकडण्यात आलेल्या गाड्या ओव्हर लोड व विना राॅयलटी रात्रीच्या वाहतूक करत असून यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थित तरुणांनी केली.
मृत तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळत नसल्याने फलटण तालुक्यातील तरुण वर्ग कमालीचा आक्रमण झाला असून येणाऱ्या काळात हा संघर्ष टोकाची भूमिका घेऊ शकतो त्या दृष्टीने प्रशासनाने तत्काळ दोन तरुणाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत कशी मिळवून दिली जाईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.