फलटण प्रतिनिधी : 29 एप्रिल,क्राईम स्पेशल
मलटण येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम एकूण ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे वस्तू चोरून नेले असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२ रोजी सकाळी ११:४५ ते ९ वाजण्याच्या दरम्यान महतपूरापेठ सद्गुरु मार्ग मलटण येथे फिर्यादी ज्ञानेश्वर खंडू घनवट (मूळ राहणार पिंप्रद तालुका फलटण जिल्हा सातारा सध्या राहणार महत्त्व पेठ सद्गुरु मार्ग मलटण) यांच्या घराचे कुलूप कोयंडा अर्धवट तोडून घरात प्रवेश करून ३० हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे दोन तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र त्यामध्ये दोन वाट्या डोरली तसेच ११२ सोन्याचे लहान ठोक्याचे मनी व आठ मोठे गोल मनी जुवा की ५२ हजार ५०० रुपये रोख रक्कम असे सोन्याचे दागिने व रोख रक्कम एकूण ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे वस्तू अज्ञात चोरट्याने चोरून नेले अशी फिर्याद ज्ञानेश्वर खंडू घनवट यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून याप्रकरणी पद्मावती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार धापते करत आहेत.