फलटण प्रतिनिधी :
काल दुपारी चारच्या सुमारास फलटण तालुक्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. दिवसभराच्या प्रचंड उकड्या नंतर झालेल्या पावसाने गारवा निर्माण केला. सध्या शेतात चारा पिके व खरिपाची बाजरीची पिके उभी आहेत मान्सून सुरू झाल्या पासून पाऊस फारच अल्प प्रमाणात झाला होता काल मात्र पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्यात समाधान निर्माण केले आहे
काल झालेल्या पावसाने शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना हा पाऊस हवा होता पावसाने अशीच ओढ दिली असती तर खरीप पिके वाया गेली असती चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता आठवड्यात झालेल्या पावसासह कालच्या पावसाने शेतात पाणी पाणी केले
फलटण ,तांबमाळ ,फरांदवाडी ,काशीदवाडी ,निंभोरे या परिसरात चांगला पाऊस झाला शेतांना तळ्यांचे स्वरूप आले होते तरीही आणखी पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, मोठा पाऊस झाला परंतू ओढे आजून वाहिले नसल्याने बंधाऱ्यात पाणी साठणे आवश्यक आहे त्या मुळे काल झालेल्या पावसा प्रमाणे आणखी दोन ते चार दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
चाऱ्याचा प्रश्न मिटणार
परिसरात झालेला दमदार पाऊस चारा पिकांसाठी संजीवनी ठरणार आहे सध्या शेतात मका व इतर चारा पिके आहेत झालेल्या पावसामुळे ही पिके चांगली येणार असून चाऱ्याचा प्रश्न तात्पुरता तरी मिटणार आहे.











