धैर्य टाईम्स :
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज विराट कोहलीच्या संयमी 76 ( 59 चेंडू 6 चौकार 2 षटकार ) धावांच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करीत दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्डकप चषकावर नाव कोरले. अक्षर पटेल 47 तर शुभम दुबे ने 26 धावा ठोकल्या. भारताने निर्धारित 20 षटकांमध्ये 176 धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात 169 धावा केल्या. भारताने टी ट्वेंटी विश्वचषकाचा अंतिम सामना सात धावांनी जिंकला. सामन्याचा मानकरी विराट कोहली ठरला.
हार्दिक पांड्याने तीन षटकांमध्ये वीस धावांच्या मोबदल्यात तीस गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराने चार षटकांमध्ये 18 धावा दोन बळी मिळवले. अर्शदीप सिंगने 4 षटकात 20 धावा देत 2 बळी मिळवले.
दक्षिण आफ्रिके कडून फलंदाजी करताना हेनरी क्लासीन याने 27 चेंडूत 57 धावांची धडाकेबाज खेळी केली. शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याच्या पहिल्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने त्याचा उत्कृष्ट झेल टिपत भारताला विजयाच्या समीप नेहले. डिकॉक ने 31 चेंडूत 39 धावा त्रिशन टेब्स याने 21 चेंडूत 31 धावा करीत निकराची झुंज दिली. अखेर भारतीय गोलंदाजांनी भारताला 7 धावांनी विजय मिळवून दिला. सुरुवातीला भारताने नाणेफेक जिकूंन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकात भारताने 7 गड्यांच्या बदल्यात 176 धावा केल्या.
भारतीय क्रिकेट संघाने 2007 मध्ये आयसीसी टी-20 क्रिकेट पहिला विश्वचषक जिंकला होता. त्याचे दक्षिण आफ्रिकेत आयोजिन करण्यात आले होते. भारतीय क्रिकेट संघ एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला होता.
आत्तापर्यंतचे विजेते आणि उपविजेते -
2007 -
विजेता : भारत
उपविजेता: पाकिस्तान
2009 -
विजेता : पाकिस्तान
उपविजेता: श्रीलंका
2010 -
विजेता : इंग्लंड
उपविजेता: ऑस्ट्रेलिया
2012 -
विजेता : वेस्ट इंडीज
उपविजेता: श्रीलंका
2014 -
विजेता : श्रींलंका
उपविजेता: भारत
2016 -
विजेता : वेस्ट इंडिज
उपविजेता: इंग्लंड
2021 -
विजेता : ऑस्ट्रेलिया
उपविजेता: न्यूझीलंड
2022 -
विजेता : इंग्लंड
उपविजेता: पाकिस्तान
2024 -
विजेता : भारतउ
पविजेता: दक्षिण आफ्रिका