देशभरात युपीआय सेवा आणि गुगल पे सेवा बंद झाली आहे. अनेक ग्राहकांना या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने ग्राहक देखील त्रस्त झाले आहेत.
असाच प्रकार 26 मार्चला देखील घडला होता. तर आज पुन्हा एकदा अशीच सेवा कोसळली आहे. वापरकर्त्यांकडून प्रचंड तक्रारी वाढल्या आहेत. नेमकी ही सेवा कशामुळे डाऊन झाली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
ग्राहकांना वस्तू खरेदी किंवा देवाण घेवाण करण्यासाठी ऑनलाईन पेमेंटसचा वापर करत आहेत. ऑनलाईन पेमेंटस अॅपवरुन पैसे पाठवण्याची प्रक्रिया अचानक डाऊन झाली आहे. आज 12 एप्रिल रोजी सकाळपासूनच यूपीआय सेवा डाऊन झाली.
यामुळं मोठ्या संख्येनं वापरकर्त्यांना समस्या आल्या आहेत. अनेक यूजर्सना यामुळं अॅपवरुन पेमेंट करता येत नाही. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम यूजर्सला या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचनाक समस्या निर्माण झाल्यानं यूजर्स त्रस्त झाले होते.
ऑनलाईन सेवा डाऊन झाल्यामुळे त्यासंदर्भातील माहिती देणाऱ्या प्लॅटफॉर्म डाऊनडिटेक्टर नुसार प्रचंड तक्रारी नोंदविल्या जात आहेत. ज्यामध्ये पेमेंट, वेबसाईट अॅक्सेस आणि अॅप संदर्भातील तक्रारी होत्या. गुगल पेसह तर पेमेंट अॅपला देखील समस्या येत असल्यानं यूजर्स त्रस्त झाले झाले आहेत. यापूर्वी 26 मार्च 2025 रोजी देखील अशीच समस्या निर्माण झाली होती.
बॅंकेचे सर्व्हर डाऊन होताच निर्माण होते समस्या
यूपीआय पेमेंट यंत्रणेला डाऊन टाईमला सामोरं जावं लागते याचे कारण अनेक बँकांच्या सर्व्हरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक समस्या हे होतं. यूपीआय आधारित पेमेंट अॅपवरुन पेमेंट होत नसल्यानं यूजर्स त्रस्त झाले.
गुगल पे, फोन पे आणि पेटीएमच्या व्यवहारांवर परिणाम झाला. अनेक सोशल मीडिया यूजर्सन या संदर्भातील तक्रारी एक्स व व्हाट्सअप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट केल्या.
यूपीआय पेमेंट यंत्रणेला डाऊन टाईमला सामोरं जावं लागते याचे कारण अनेक बँकांच्या सर्व्हरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक समस्या हे होतं. यूपीआय आधारित पेमेंट अॅपवरुन पेमेंट होत नसल्यानं यूजर्स त्रस्त झाले.
अशी समस्या आल्यावर नेमकं काय करावं?
यूपीआय सेवा वापरणाऱ्या आणि त्यामाध्यमातून फक्त ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यूपीआयच्या सेवांमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास वैकल्पिक म्हणजेच रोख रकमेचा वापर व्यवहारांसाठी करावा. याशिवाय तुम्ही बँका आणि किंवा पेमेंट सर्व्हिसेस प्रोवयडर्सला संपर्क करा. काही यूजर्सला ही समस्या केवळ त्यांनाच येत असल्याचं वाटल्यानं ते त्रस्त झाले होते.